7th Pay Commission DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA मध्ये झाली मोठी वाढ; ट्वीट करत सरकारने दिली अपडेट!

7th Pay Commission: कर्नाटक सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 1 जानेवारीपासून वाढ केली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission: कर्नाटक सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 1 जानेवारीपासून वाढ केली आहे. अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी याची प्रतीक्षा करत होते, मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे हा निर्णय रखडला होता.

आता, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार, जानेवारीपासून आतापर्यंतची थकबाकी मे महिन्याच्या पगारात दिली जाईल. सरकारने DA आणि DR मध्ये किती वाढ केली आहे ते जाणून घेऊया...

4 टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता

कर्नाटकातील (Karnataka) सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात सरकारकडून वाढ जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत सूचनेनुसार, 1 जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांना DA आणि पेन्शनधारकांना DA दिला जाईल.

राज्य सरकारने डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर, महागाई भत्ता आणि महागाई सवलत दोन्ही 31 टक्क्यांवरुन 35 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या निर्णयानंतर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

हरियाणामध्येही महागाई भत्त्यासंबंधी घोषणा करण्यात आली

यापूर्वी, हरियाणा सरकारने (Government) राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. वित्त विभागाच्या आदेशानुसार, 1 जानेवारी 2023 पासून डीए मूळ वेतनाच्या 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे.

सर्वप्रथम केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्क्यांनी वाढ केली होती. केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्यानंतर, आता सर्व राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरु झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT