Reliance Jio Dainik Gomantak
अर्थविश्व

Jio चे 200 रुपयांच्या आतील हे प्लॅन देतात अमर्याद कॉलिंग सेवा!

200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अधिक डेटा, अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि इतर सेवांचा लाभ मिळू शकतो.

दैनिक गोमन्तक

Reliance Jio: काही वर्षांपूर्वी इतर खाजगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांना मागे टाकत आलेला रिलायन्स जियो ब्रॅंड बनला आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रीचार्ज प्लॅन घेऊन येत असते. रिलायन्स जियो आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास प्‍लॅन ऑफर करतात. ज्यामध्ये तुम्ही अधिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. तथापि, हे प्‍लॅन थोडे महाग असू शकतात. पण आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अधिक डेटा, अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि इतर सेवांचा लाभ मिळू शकतो. (Jio's Rs 200 plan offers unlimited calling services!)

जिओने ऑफर केलेला जिओचा एक प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. तसेच यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा अॅपचा मोफत लाभ घेऊ शकता. हा प्‍लॅन 23 दिवसांच्या वैधतेसह येतो.

रुपये 179 च्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी पर डे नुसार 21 जीबी डेटासह 14 दिवसांसाठी 300 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही जिओच्या सेवा जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा चाही लाभ घेऊ शकता.

149 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 जीबी डेटानुसार दररोज 24 जीबी डेटा दिला जातो. दररोज 100 एसएमएस सोबत, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सुरक्षा आणि जिओ क्लाउड सुविधा अमर्यादित कॉलिंग आणि सबस्क्रिप्शनमध्ये दिली जाते. त्याची वैधता 24 दिवसांसाठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT