Jio Financial 
अर्थविश्व

Jio Financial शेअर सुसाट... एका महिन्यात दिला 36% परतावा

Ashutosh Masgaunde

Jio Financial Share becomes rocket, given 36% return in one month:

मुकेश अंबानींच्या(Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपची कंपनी असलेल्या Jio Financial च्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात वाढीसह उघडला आणि पहिल्या ट्रेडिंग तासात सुमारे 14 टक्क्यांनी वाढला. या काळात शेअरने ३४७ रुपयांचा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत हा शेअर 9.45 टक्क्यांच्या वाढीसह 331 रुपयांवर व्यवहार करत होता.

जिओ फायनान्शियलच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून प्रचंड वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत शेअरने 18.87 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने 36 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर सहा महिन्यांत शेअर 45 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

जिओ फायनान्शिअलच्या शेअर्सच्या वाढीचा परिणाम त्याच्या मार्केट कॅपवर झाला आहे. 328 रुपयांच्या शेअर प्राइसवर, Jio Financial चे मार्केट कॅप 2.10 लाख कोटी रुपये झाले आहे, ज्यामुळे ते बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह नंतर कंपनी तिसरी सर्वात मोठी NBFC बनली आहे.

Jio Financial Services Limited ही NBFC कंपनी आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून 1999 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यानंतर 2002 मध्ये त्याचे नाव बदलून रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड करण्यात आले आणि त्यानंतर जुलै 2023 मध्ये त्याचे नाव बदलून Jio Financial Services Limited करण्यात आले.

कंपनी कर्ज, विमा, ब्रोकिंग, पेमेंट बँक आणि पेमेंट सोल्यूशन्समध्ये व्यवहार करते. डिसेंबर 2023 मध्ये कंपनीला 294 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 414 कोटी रुपये होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT