रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट सिस्टम आणि डिजिटल फायनॅन्शियल इनोव्हेशन वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. तर रिझर्व्ह बँकेने बँक इंडोनेशियाशी (Bank Indonesia) करार केला आहे. यासोबतच दोन्ही बाजूंनी एएमएल आणि एसएफटी सारख्या क्षेत्रामध्ये एकमेकांना मदत करण्याचे या करारात सांगण्यात आले आहे. (RBI has entered into an agreement with Bank Indonesia)
MoU करारावर स्वाक्षरी
दोन्ही मध्यवर्ती बँकांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी बाली येथे G20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर यांच्या बैठकीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
RBI ने एक निवेदन जारी केले
RBI ने एका निवेदनात म्हटले की या सामंजस्य करारामुळे RBI आणि BI दोन्ही मध्यवर्ती बँक संबंध मजबूत करतील आणि पेमेंट सिस्टमसाठी नियामक सहकार्याची देवाणघेवाण देखील करतील, पेमेंट सेवांमधील डिजिटल नवकल्पना आणि AML-CFT मजबूत करण्यासाठी एकमेकांसोबत वचनबद्ध आहेत.
कोण सहभागी होते?
धोरणात्मक संवाद, तांत्रिक सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त कार्य याद्वारे सामंजस्य कराराची अंमलबजावणी केली जाणार आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) आणि BI गव्हर्नर पेरी वार्जियो यांच्या उपस्थितीत RBI डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा आणि BI डेप्युटी गव्हर्नर दोडी बुडी वालुयो यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
काय म्हणाले शक्तीकांता दास?
या प्रसंगी दास म्हणाले की, हा सामंजस्य करार औपचारिक यंत्रणेत आमच्या संयुक्त प्रयत्नांना पुढे नेण्याच्या दिशेने एक पाऊलच आहे. या करारामुळे दोन्ही देशांना त्यांची आर्थिक व्यवस्था सुलभ, सर्वसमावेशक आणि सुरक्षित बनवण्यात मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.