iPhone 17 Price Dainik Gomantak
अर्थविश्व

iPhone 17 Price: भारतात किती रूपयांना मिळणार आयफोन 17? कधी होणार लॉन्च? जाणून घ्या

iPhone 17 Price Leak: या वर्षाच्या अखेरीस Apple कंपनी त्यांची पुढील iPhone मालिका लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही आयफोनच्या नवीन मॉडेल्ससाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय.

Sameer Amunekar

Apple iPhone 17 सिरीज गेल्या काही महिन्यांपासून टेक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. Apple दरवर्षी आपल्या नवीन iPhone सिरीज सप्टेंबर महिन्यात लाँच करत असतो आणि यावर्षीही त्याच परंपरेनुसार iPhone 17 सिरीज लाँच होण्याची शक्यता आहे.

या सिरीजअंतर्गत iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air हे मॉडेल्स लाँच होणार असल्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार या सिरीजची अनेक खास वैशिष्ट्यं आधीच समोर आली आहेत.

एका ताज्या लीक रिपोर्टनुसार, भारतात iPhone 17 ची किंमत सुमारे ₹79,900 पासून सुरू होऊ शकते, तर अमेरिकेत ही किंमत सुमारे $799 म्हणजे जवळपास ₹67,000 इतकी असू शकते. त्यामुळे भारताच्या तुलनेत अमेरिका, दुबई आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये iPhone 17 स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.

वैशिष्ट्यं

  • iPhone 17 मध्ये नवीन AI-बेस्ड चिपसेट, हलकं वजन आणि अधिक स्लिम डिझाइन असेल.

  • iPhone 17 Pro Max मध्ये 48MP टेलिफोटो लेन्स, 120Hz रिफ्रेश रेटसह OLED डिस्प्ले असू शकतो.

  • नवीन "iPhone 17 Air" हे मॉडेल खास तरुणांसाठी आणि लाइट युजर्ससाठी डिझाइन केलं जात असल्याचं बोललं जात आहे

किंमत किती असेल?

भारतासह अनेक देशांमध्ये iPhone 17 विक्रीसाठी उपलब्ध होणार असला, तरी प्रत्येक देशात त्याची किंमत वेगवेगळी असणार आहे. सध्याच्या लीक माहितीनुसार, iPhone 17 सर्वात स्वस्त दरात दुबई आणि अमेरिका मध्ये उपलब्ध असणार आहे.

यूएसएमध्ये iPhone 17 ची किंमत सुमारे $799, म्हणजेच ₹67,000 इतकी असू शकते. दुबईमध्ये ही किंमत AED 2,949 म्हणजेच जवळपास ₹66,500, सिंगापूरमध्ये याची किंमत SGD 1,270 म्हणजेच सुमारे ₹77,000 असण्याची शक्यता आहे. भारतामध्ये iPhone 17 साठी अंदाजे ₹79,900 इतकी किंमत अपेक्षित आहे. तर युकेमध्ये याची किंमत £799 म्हणजेच सुमारे ₹84,000 इतकी असू शकते.

कधी होणार लॉन्च?

iPhone 17 सिरीजची अधिकृत लाँचिंग तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. मात्र, अ‍ॅपलच्या पूर्वीच्या ट्रेंडनुसार ही सिरीज 2025 च्या सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. iPhone 17 सिरीजमध्ये दमदार फीचर्स, स्टायलिश डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार असल्याने, अ‍ॅपलप्रेमींमध्ये याचे प्रचंड उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

Cable Theft Shigao: शिगावमध्ये वीज खात्याच्या केबल चोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT