Mutual Fund Investement: Dainik Gomantak
अर्थविश्व

Mutual Fund: डेबिट कार्डद्वारेही करता येईल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; प्रक्रिया झाली सोपी

दोन बँकांच्या ग्राहकांना मिळणार सुविधा

गोमंतक ऑनलाईन टीम

Mutual Fund Investement: गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहिले जाते. तथापि, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया अनेकांना जिकिरीची वाटते. अनेक म्युच्युअल फंड्सनी खरे तर ही प्रक्रिया खूप सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे घरात बसूनही एखाद्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणे शक्य झाले आहे. त्यानंतर आता डेबिट कार्डद्वारेही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार आहे.

जर तुमच्याकडे VISA डेबिट कार्ड असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात कोणत्याही अडचणीशिवाय गुंतवणूक करू शकता. तुम्हाला बँक खाते लिंक करण्याची गरज भासणार नाही.

व्हिसा कार्डने हा उपक्रम सुरू केला आहे. व्हिसाने या सुविधेसाठी Razorpay सोबत भागीदारी केली आहे. मात्र, सध्या सर्व बँक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. इकॉनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार ही सुविधा फक्त फेडरल बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनाच घेता येणार आहे.

तुम्ही मर्यादा सेट करू शकता

या दोन बँकांच्या ग्राहकांना व्हिसा डेबिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल. तसेच व्यवहाराची मर्यादा सेट करण्यासह आणि त्यात सुधारणा देखील करता येईल. डेबिट कार्डशी लिंक केलेल्या सर्व SIP, इतर पेमेंटसह संबंधित गुंतवणूकदाराला बँकेच्या व्यवस्थापन पोर्टलवर लॉग इन करून पाहता येऊ शकते.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल

याबाबत बोलताना व्हिसा इंडियाचे प्रमुख रामकृष्णन गोपालन म्हणाले की, 69 दशलक्षाहून अधिक म्युच्युअल फंड एसआयपी खाती असलेल्या देशात डेबिट कार्ड पेमेंट मुळे एक वेगळी आणि सोपी सुविधा उपलब्ध झाली आहे. म्युच्युअल फंडात या सुविधेचे अनेक फायदे होतील.

म्युच्युअल फंडातील या पेमेंट प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल. याशिवाय म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वासही वाढेल. यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढेल.

तुमच्या बँकेने दिलेले जे डेबिट कार्ड असते ते कोणत्या कंपनीचे आहे, त्याचे नाव कार्डवर असते. उदा. MasterCard, Visa, Rupay, Diners Club इत्यादी सर्व कार्ड प्रदाता कंपन्या आहेत. त्या बँकेशी करार करतात आणि ग्राहकांना पेमेंट प्रक्रिया सुविधा देतात. ते बँका आणि ग्राहकांना जोडण्याचे कामही करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT