Atal Pension Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् दर महा 5 हजार गॅरिटेंड पेन्शन मिळवा

दैनिक गोमन्तक

चांगले जीवन जगण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला काही उत्पन्नाची (income) आवश्यकता असते, ज्यासाठी लोक सरकारी (Government) किंवा खाजगी (private) संस्थांमध्ये काम करतात किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार असतात. पण निवृत्तीनंतर आपल्या उत्पन्नाचे साधन काय असू शकते, हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनात येतो. काम करणारी व्यक्ती असो किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार असो, म्हातारपणी त्यांच्या खर्चाचा आधार काय असू शकतो हे प्रत्येकाच्या मनात नक्कीच येते. ही परिस्थिती पाहता सरकारने विशेषतः असंघटित क्षेत्रातील लोकांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली होती. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करून पेन्शन मिळवू शकतो. हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे प्रशासित केले जाते. (Invest in this government scheme, get the benefit of 5 thousand guaranteed pension every month)

वयोमर्यादेनुसार पीएफआरडीएने 31 जुलै 2021 रोजी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेल्या लोकांचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार आतापर्यंत जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 21 ते 25 वयोगटातील लोकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक केली आहे, जी एकूण संख्येच्या 27 टक्के म्हणजे सुमारे 90 लाख आहे. त्याच वेळी, 26 ते 30 वयोगटातील लोकांची संख्या सुमारे 80 लाख म्हणजे एकूण संख्येच्या 25 टक्के आहे. 31 ते 35 वयोगटातील या योजनेतील गुंतवणूकदारांची संख्या 63 लाखांसह सुमारे 19 टक्के आहे, तर सुमारे 51 लाखांसह 18 ते 20 वयोगटातील लोकांची संख्या 16 टक्के आहे. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यात सर्वात कमी गुंतवणूक केली आहे. ही संख्या एकूण गुंतवणूकदारांच्या 11 टक्के म्हणजे सुमारे 36 लाख आहे.

या योजनेचे काय फायदे आहेत

जर तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये 20 वर्षे गुंतवणूक केली तर वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांच्या हमी मासिक पेन्शनचा लाभ मिळेल. जर तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला दरमहा 1000 रुपयांची हमी मासिक पेन्शन मिळवण्यासाठी या योजनेत 42 रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर 5000 रुपयांची हमी पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील.

अशा प्रकारे खाते उघडा

अटल पेन्शन योजनेमध्ये, तुम्हाला ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे त्या बँकेत जाऊन APY नोंदणी फॉर्म भरावा लागेल, तसेच तुमचा आधार आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्या बचत खात्यात रक्कम उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ...तर गोव्याचा अंत निश्‍चित! ‘भूतानी’वरुन पर्यावरणप्रेमी संतप्त

Bhandari Community In Goa: भंडारी समाजामध्ये नव्या संघटनेसाठी हालचाली? लवकरच घोषणा होण्याची शक्यता..

गोव्यात सत्ताधारी पक्षाचे निष्ठावान प्रतिमेमुळे हतबल; मंत्र्यांची तोंडे चार दिशांना, सभापतीही असाहाय्य

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

SCROLL FOR NEXT