sukanya samriddhi yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

SSY Scheme: सरकारच्या या योजनेत दरमहा ₹12,500 ची गुंतवणूक करून होतील 64 लाख

सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान बचत योजना आहे जी भारत सरकारद्वारे भारतामध्ये चालवली जाते.

दैनिक गोमन्तक

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक लहान बचत योजना आहे जी भारत सरकारद्वारे भारतामध्ये चालवली जाते. ही बालिका योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेंतर्गत मुलीचे पालक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही दरमहा किमान रक्कम जमा करून लाखोंचा निधी देखील तयार करू शकता. (Invest ₹12,500 per month in sukanya samriddhi yojana government scheme and earn lakhs of rupees)

आम्ही तुम्हाला सांगतो की, सरकारच्या या योजनेत तुम्हाला केवळ उत्तम रिटर्न कमावण्याची संधी मिळणार नाही, तर तुम्ही कर देखील वाचवू शकता. एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात SSY खात्यात ₹1.5 लाखांपर्यंत जमा करू शकते आणि प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखाच्या संपूर्ण गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा दखील करू शकते.

व्याज किती आहे?

Q2FY23 साठी SSY व्याज दर 7.6 टक्के एवढा आहे. तसेच हा दर अजूनही महागाईच्‍या सरासरी दरापेक्षा खूप वर आहे. म्हणून, जर एखादा गुंतवणूकदार त्यांच्या मुलीचे भविष्य सुधारू शकेल अशी बचत योजना शोधत असेल, तर SSY खाते तिच्यासाठी एक चांगला पर्याय देखील असू शकतो. कृपया लक्षात घ्या की या योजनेत कोणताही धोका नाहीये.

सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana)

या योजनेत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या नावावर दरमहा ₹ 12,500 ची गुंतवणूक केली, तर लॉक-इनच्या 21 वर्षानंतर, त्याच्याकडे सुमारे ₹ 64 लाखांचा निधी असणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीने तिच्या वर्षाच्या मुलीच्या नावाने SSY खाते उघडले, तर ती पुढील 14 वर्षांसाठी खात्यात गुंतवणूक करू शकेल आणि मग मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिला खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. संपूर्ण कालावधीसाठी 7.60 टक्के सपाट व्याजदर गृहीत धरून, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या 18 वर्षानंतर उपलब्ध 50 टक्के रक्कम काढली नाही, तर त्याला सुमारे 64 लाखांची परिपक्वता रक्कम हाती मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता म्हणजे महिन्याचे 12,500 एवढी रक्कम झाली.

खाते कुठे उघडायचे?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेमध्ये उघडता येते आणि या योजनेंतर्गत खाते मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षापूर्वी 250 रुपयांच्या ठेवीसह उघडले जाऊ शकते.

हे कागदपत्र द्यावे लागेल का?

खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्मसोबत जमा करावे लागेल आणि याशिवाय मुलगी आणि पालकांचे ओळखपत्र जसे की पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट देखील द्यावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT