Chinese Smartphone Ban: चिनी मोबाईल कंपन्यांवर सरकार बंदी घालणार, देशी कंपन्याना प्रोत्साहन

मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन कंपन्यांना चांगले दिवस येणार
Chinese Smartphone
Chinese SmartphoneDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकार चिनी मोबाईल कंपन्यांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. (Chinese Mobile to Ban in India) देशी मोबाईल कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कमी किमतीच्या चिनी कंपन्यांच्या मोबाईलवर बंदी घालून, मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बनसारख्या (Lava, Micromax And Carbon) भारतीय मोबाइल कंपन्यांना बाजारपेठ खुली होणार आहे.

चीनची कंपनी शाओमी (Xiaomi) देशात स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. शाओमीच्या विविध मॉडेल्सचे अँड्रॉईड (Android) फोन देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एका रिपोर्टनुसार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय चीनच्या मोबाइल कंपन्यांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

Chinese Smartphone
HDFC Bank Hikes MCLR: HDFC बँकेने केली मोठी घोषणा, ग्राहकांना मोठा झटका

भारतीय मोबाईल निर्मात्या कंपनी मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इतर देशांतर्गत ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. चीनच्या कमी किंमतीचे स्मार्टफोन विकण्यावर बंदी घालण्याचा सरकार विचार करत आहे. त्यानुसार चिनी कंपन्या भारतात बारा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन विकू शकणार नाहीत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन सारखे फोन देशात अतिशय लोकप्रिय होते. परंतु Xiaomi सारख्या चिनी कंपन्या बाजारात येताच देशी कंपन्यांचे स्मार्टफोन ग्राहकांपासून दूर झाले. वास्तविक, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांनी कमी किमतीत जास्त स्टोरेज, उत्तम कॅमेरे असणारे उत्तम दर्जाचे स्मार्टफोन देऊन ग्राहकांना उपलब्ध करून दिले. दरम्यान, सरकारने चिनी स्मार्टफोन विक्रीला देशात बंदी घातल्यास मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन कंपन्यांना चांगले दिवस येतील यात शंका नाही.

Chinese Smartphone
Goa panchayat election 2022: उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com