उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना केंद्र सरकारने (Central Government) झेड सुरक्षा दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबीच्या गुप्तचर माहितीच्या आधारे ही सुरक्षा अदानी यांना देण्यात आली. सुरक्षेचा सर्व खर्च गौतम अदानी स्वतः उचलणार आहेत. झेड सुरक्षा अंतर्गत एकूण 33 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. (Industrialist Gautam Adani has been given Z security by the central government)
दरम्यान, गौतम अदानी यांच्या आधी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनाही झेड सुरक्षा देण्यात आली होती. अंबानी त्यांच्या सुरक्षेचा खर्च देखील उचलतात आणि ही रक्कम मासिक आधारावर देण्यात येते. या अटींच्या आधारे गौतम अदानी यांनाही झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.