Jio Independence Offer: पैसा वसूल प्लॅन! कॉलिंग, डेटा सोबत जिओ देणार 3 कूपन

भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिओने एक खास ऑफर आणली आहे.
Jio Independence Offer
Jio Independence OfferDainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिओने एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी इंडिपेंडन्स ऑफर 2022 सादर केली आहे या ऑफरमध्ये वापरकर्त्यांना केवळ कॉलिंग फायदे मिळणार नाहीत तर, डेटा आणि एसएमएस आणि वापरकर्त्यांना इतर कूपन सवलतींचा लाभ देखील मिळणार आहे. (On the occasion of India 75th Independence Day Jio has introduced special recharge plans)

Jio Independence Offer
Airtel देणार ग्राहकांना खूशखबर! 5,000 शहरांमध्ये पोहोचवणार 5G सेवा

या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना 2999 रुपयांच्या रिचार्जवर 100% व्हॅल्यू बॅक फायदे मिळतील तसेच 9 ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर 2999 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्यांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे. वापरकर्त्यांना Netmeds, AJIO, Ixigo आणि 75GB 4G डेटासाठी रिडीम कूपन देखील मिळतील.

ऑफर कूपन 72 तासांच्या आत सबस्क्राइबरच्या My Jio अॅपवर जमा करण्यात येतील. या ऑफर अंतर्गत यूजर्सना चार कूपन मिळतील तसेच Jio च्या '2999 इंडिपेंडन्स ऑफर 2022' मध्ये उपलब्ध असलेल्या 100% व्हॅल्यू बॅक ऑफर फायदे.

जिओ प्लॅनमध्ये काय फायदे आहेत?

दूरसंचार सेवांबद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीचा वार्षिक प्लॅन आहे यामध्ये यूजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 2.5GB दैनिक डेटा, दररोज 100 SMS आणि एक वर्षाचे Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील आहे. वापरकर्त्यांना Jio अॅप्स आणि सेवांचाही प्रवेश आहे.

Jio Independence Offer
Goa Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

जिओ काय अतिरिक्त देत आहे?

या प्लानमध्ये यूजर्सना 75GB हाय स्पीड डेटा व्हाउचर मिळणार आहे. याशिवाय Netmeds, Ixigo आणि Ajio चे कूपन मिळतील. Netmeds च्या कूपनच्या मदतीने, वापरकर्त्यांना 25% ची सूट मिळेल ही सवलत रु. 1000 आणि त्यावरील खरेदीवर लागू आहे. 2999 रुपयांच्या रिचार्जवर यूजर्सना 3 कूपन देण्यात येणार आहेत.

याशिवाय ग्राहकांना Ixigo वर 750 रुपयांची सवलत मिळणार आहे. ही सवलत 4500 रुपये आणि त्याहून अधिक खर्चावर असणार आहे. तसेच, ग्राहकांना Ajio 2,990 रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. ही सर्व कूपन वापरकर्त्यांना त्यांच्या My Jio अॅपमध्ये उपलब्ध असणार आहे.

वापरकर्ते 75GB चा डेटा व्हाउचर ट्रान्सफर करू शकणार नाहीत आणि अशा वापरकर्त्यांना 2,999 रुपयांच्या रिचार्जवर 100% व्हॅल्यू बॅक फायदे मिळत आहेत. वापरकर्ते 31 डिसेंबरपर्यंत Ixigo कूपन वापरू शकतात, तर Ajio कूपनची वेळ 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे. तुम्ही फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत Netmeds कूपन वापरू शकणार आहात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com