Indigo Airline Flight To Goa Dainik Gomantak
अर्थविश्व

Flight To Goa: येत्या 23 मे पासून 'या' शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होतेय, जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी ही विमानसेवा 25 एप्रिलपासून उन्हाळ्याच्या दरम्यान सुरू केली जाणार होती.

Pramod Yadav

Flight To Goa: गोव्यात मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोळी विमानतळ कार्यरत असून, दोन्ही विमानतळावर प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. दोन्ही विमानतळावर विदेशातील तसेच, देशातील विविध शहारातून विमाने दाखल होतायेत. मोपा कार्यरत झाल्यानंतर अनेक शहरातून विमानसेवा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भारतातील आणखी एका शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू झाली आहे.

इंडिगो डेहराडून विमानतळावरून विविध शहरांमध्ये जास्तीत जास्त उड्डाणे चालवणारी एअरलाइन आहे. इंडिगो 23 मे पासून डेहराडून-गोवा दरम्यान थेट उड्डाण सुरू करणार आहे. हे विमान आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे.

इंडिगोचे हे विमान गोव्यातील प्रवाशांना घेऊन संध्याकाळी 5.30 वाजता डेहराडूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचेल. अर्ध्या तासानंतर येथून संध्याकाळी सहा वाजता गोव्यासाठी विमान उड्डाण भरेल. इंडिगो डेहराडून-गोवा दरम्यान 186 सीटर मोठे विमान कार्यरत असेल. हे उड्डाण सुरू झाल्यानंतर डेहराडून थेट देशातील अन्य शहराशी हवाई मार्गाने जोडले जाईल.

यापूर्वी ही विमानसेवा 25 एप्रिलपासून उन्हाळ्याच्या दरम्यान सुरू केली जाणार होती, याबाबत डीजीसीएकडूनही परवानगी घेण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता इंडिगो 23 मे पासून ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो हे विमान आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सेवा देणार आहे.

डेहराडून विमानतळावर दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, मुंबई, बंगलोर, लखनौ आणि पुणे या शहरांसाठी थेट विमान उड्डाणे आहेत. यात इंडिगोची सर्वाधिक 14 उड्डाणे आहेत, विस्तारा आणि एअर इंडियाची प्रत्येकी दोन उड्डाणे आहेत.

GoFirst कंपनीची येथून सध्या कोणतेही विमानसेवा चालवत नाही. दिवाळखोरीमुळे, GoFirst ने 1 मे पासून आपली उड्डाणे बंद केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT