Indigo Creates History Dainik Gomantak
अर्थविश्व

Indigo Creates History: इंडिगोने रचला इतिहास, असा विक्रम करणारी ठरली पहिली भारतीय विमान कंपनी

Indigo Creates History: देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगो एअरलाइनने इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

Indigo Creates History: देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगो एअरलाइनने इतिहास रचला आहे. एका वर्षात 10 कोटी प्रवाशांचा आकडा इंडिगोने पार केला. असा विक्रम करणारी ही पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे. यासह ती आता जगातील आघाडीच्या एअरलाइन्समध्येही सामील झाली.

पहिली भारतीय विमान वाहतूक कंपनी बनली

कंपनीने सांगितले की, ''आजपर्यंत कोणत्याही भारतीय विमान कंपनीने ही कामगिरी केलेली नाही. एका वर्षात आम्हाला 10 कोटी लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत कोणत्याही भारतीय विमान कंपनीला हा टप्पा गाठता आलेला नाही. आता आम्ही जगातील टॉप 10 एअरलाइन्समध्ये सामील झालो आहोत. या कालावधीत, इंडिगोने सर्वाधिक उड्डाणे उडवण्याच्या बाबतीत जगातील 10 प्रमुख एअरलाइन्समध्ये यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केले आहे.''

कर्मचाऱ्यांचे आभार मानले

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, ''आम्हाला हे यश मिळाल्याने खूप आनंद होत आहे. यावरुन इंडिगोवरील लोकांचे प्रेम आणि विश्वास दिसून येतो. हा आकडा गाठण्यासाठी कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भविष्यातही इंडिगो लोकांच्या सेवेसाठी समर्पित राहील.''

दरम्यान, इंडिगोने गेल्या सहा महिन्यांत 20 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर आपली उड्डाणे सुरु केली. यासोबतच कंपनीने देशांतर्गत मार्गांवरही आपली पोहोच वाढवली आहे. इंडिगो लवकरच इंडोनेशियातील बाली आणि सौदी अरेबियातील मदिना येथे उड्डाणे सुरु करणार आहे.

देशांतर्गत बाजारात इंडिगोचा वाटा 61.8 टक्के आहे

आकडेवारीनुसार, नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारात इंडिगोचा हिस्सा 61.8 टक्के होता. याच्या मागे एअर इंडिया आहे, ज्याचा बाजार हिस्सा इंडिगोपेक्षा सहापट आहे. भारतीय बाजारपेठेतील कोणतीही कंपनी इंडिगोशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाही. अलीकडेच कंपनीने 500 Airbus A320 खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीच्या ताफ्यात 1000 हून अधिक विमाने असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT