Indigo Success Story: याला म्हणावं यश! तिकिटे विकून भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी बनवली, आता खरेदी करणार 500 विमाने

Indigo Success Story: भारतीय विमानसेवा क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. दरम्यान, काही कंपन्या बंद झाल्या तर काही अजूनही नव-नवीन उंची गाठत आहेत.
Indigo Success Story
Indigo Success StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Indigo Success Story: भारतीय विमानसेवा क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. दरम्यान, काही कंपन्या बंद झाल्या तर काही अजूनही नव-नवीन उंची गाठत आहेत.

मात्र, एअर इंडिया आणि इंडिगोने या क्षेत्रात जी ओळख निर्माण केली, ती इतर कोणत्याही विमान कंपनीला निर्माण करता आली नाही.

पण एअर इंडियापेक्षा इंडिगोने अधिक यश मिळवले. आज ही देशातील सर्वात मोठी एअरलाइन आहे. चला तर मग या एअर लाइनला एवढं यश कोणी मिळवून दिलं त्यांच्याविषयी आज जाणून घेऊया...

इंडिगोची सुरुवात

इंडिगो, ज्याची मूळ कंपनी इंटरग्लोव्ह एव्हिएशन आहे. राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी ही एअर लाइन सुरु केली होती.

त्याआधी, 1988 मध्ये राहुल त्यांच्या वडिलांच्या एअरलाइन तिकीट एजन्सी 'दिल्ली एक्स्प्रेस' मध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांनी इंटरग्लोब ग्रुप सुरु केला.

Indigo Success Story
Success Story: घरच्यांकडून पॉकेटमनी मागायच्या वयात, ड्रॉप आऊट तरुणाने उभारली 7300 कोटींची कंपनी

राहुलला राकेशची गरज होती

राकेश गंगवाल अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्समध्ये काम करत होते. त्याचवेळी, इंटरग्लोब भारतात (India) त्यांची जनरल सेल्स एजंट होती. इंडिगो हे राहुल यांचे स्वप्न असले तरी त्यांना राकेश यांची साथ हवी होती.

वास्तविक, त्यांनी अनेक देशांच्या एअरलाइन्समध्ये काम केले होते. म्हणजेच त्यांचा अनुभव राहुल यांच्यासाठी उपयुक्त ठरला. इंडिगोला 2004 मध्ये एअरलाइन म्हणून परवाना मिळाला आणि राहुल यांनी इंटरग्लोब एव्हिएशन सुरु केले.

राकेश यांना इंडिगोमध्ये सहभागी व्हायचे नव्हते

राहुल यांना राकेश यांची साथ हवी होती. परंतु राकेश यांना भारतातील एअरलाइन्स सेक्टरची स्थिती पाहता इंडिगोमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. मात्र, शेवटी राहुल यांनी खूप समजावून सांगितल्यावर राकेश विमान कंपनीत रुजू झाले.

इंडिगोने 2006 मध्ये सेवा देण्यास सुरुवात केली, ती जुलै 2023 पर्यंत 63.4 टक्के बाजारपेठेसह देशातील सर्वात मोठी एअरलाइन आहे.

Indigo Success Story
Success Story: "तुमचा मुलगा वाया गेलाय!" 5 हजार कमावणाऱ्या आशुतोषने 11 महिन्यांत उभी केली करोडोंची कंपनी

500 विमाने खरेदी करण्याची तयारी सुरु आहे

काही दिवसांपूर्वीच, इंडिगोने एअरबससोबत 500 विमाने खरेदी करण्याचा करार केला. या क्षेत्राच्या इतिहासातील हा एक रेकॉर्ड आहे.

Indigo Success Story
Success Story: मळके कपडे धुवून 110 कोटी कमावले, 84 लाखांची नोकरी सोडून तरुण बनला लाँड्री मॅन

मार्केट शेअर किती आहे

इंडिगोच्या तुलनेत, टाटा समूहाच्या विस्तारा आणि एअर इंडियाचा (Air India) एकत्रित बाजारहिस्सा जुलैमध्ये 25.8 टक्के होता. 2019 मध्ये राहुल यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर राकेश यांनी 95,772 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह इंडिगोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला बराचसा हिस्साही विकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com