Indigo Flight Dainik Gomantak
अर्थविश्व

Indigo Airline Offer: आता फ्लाइट तिकिटांवर मिळणार एवढ्या हजारांची सूट, 'ही' खास ऑफर...

Indigo Airline Offer: तुमचाही येत्या काही दिवसांत विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर आता इंडिगो एअरलाइन तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे.

Manish Jadhav

Indigo Airline Offer: तुमचाही येत्या काही दिवसांत विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर आता इंडिगो एअरलाइन तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात तिकीट बुक करु शकता.

आता कंपनीने प्रवाशांना तिकिटावर 2000 रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची ही ऑफर 2 ऑगस्ट 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध आहे. इंडिगोने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

कंपनीला 17 वर्षे पूर्ण होत आहेत

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ऑपरेशनला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कंपनी प्रवाशांना (Passengers) सवलतीचा लाभ देत आहे. कंपनीने 'अ‍ॅनिव्हर्सरी सेल' सुरु केला आहे. कंपनी तिकीट बुकिंगवर ग्राहकांना 17 टक्के सूट देत आहे.

सर्व ग्राहक लाभ घेऊ शकतात

यासोबतच ही ऑफर सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने या ऑफरला 'HappyIndiGoDay' असे नाव दिले आहे. या सगळ्याशिवाय यावेळी कंपनीने ग्राहकांना त्यांची आवडती सीट निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यासाठी तुम्हाला 17 रुपयाचे पेमेंट करावे लागेल.

कोणत्याही अॅप किंवा वेबसाइटवरुन बुक करा

इंडिगो एअरलाइनने सांगितले की, तुम्ही कोणत्याही वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरुन तिकीट बुक करु शकता. तुम्हाला सर्व प्रकारच्या तिकिटांवर सूट मिळत आहे. सवलतीची मर्यादा रु.2,000 पर्यंत आहे.

क्रेडिट कार्डवर कॅशबॅक मिळेल

याशिवाय, ग्राहकांना क्रेडिट कार्ड (Credit Card) ऑफर्सचाही लाभ मिळत आहे. अमेरिकन एक्सप्रेस आणि एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डवर तिकीट बुकिंगच्या वेळी तुम्हाला अतिरिक्त सवलत मिळेल. या कार्डांद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला कॅशबॅकचा लाभ मिळेल.

अमेरिकन एक्सप्रेसच्या ग्राहकांसाठी, 5,000 रुपयांच्या किमान ऑर्डर मूल्यावर 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक असेल. दुसरीकडे, तुम्ही HSBC च्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना रु.3500 च्या ऑर्डर मूल्यावर 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT