IndiGo Market Cap: इंडिगोने रचला आणखी एक रेकॉर्ड, एक लाख कोटी मार्केट कॅप असलेली देशातील...

IndiGo Market Cap: इंडिगो एअरलाइन्सची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड ही 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली देशातील पहिली एअरलाइन बनली आहे.
Indigo Flight
Indigo FlightDainik Gomantak
Published on
Updated on

IndiGo Market Cap: इंडिगो एअरलाइन्सची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड ही 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली देशातील पहिली एअरलाइन बनली आहे. BSE वर कंपनीची उलाढाल रु. 9.20 कोटी होती, ज्याचे मार्केट कॅप रु. 1,01,007.56 कोटी होते.

बुधवारी एअरलाइन्सचा शेअर 2,619.85 रुपयांवर बंद झाला. 2023 मध्येच शेअरची किंमत आतापर्यंत 28 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. वाडिया समूहाच्या मालकीच्या विमान कंपनी GoFirst ने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर इंडिगोच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

ऑर्डरनंतर स्टॉकमध्ये प्रचंड वाढ

नुकतेच, इंडिगोने 2030 ते 2035 दरम्यान 500 एअरबस निओ फॅमिली विमानांच्या मोठ्या ऑर्डची घोषणा केली. 50 अब्ज डॉलरचा हा करार विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा करार आहे.

इंडिगोकडून एकाच वेळी 500 विमानांची ऑर्डर ही विमान उद्योगातील सर्वात मोठी ऑर्डर आहे. ब्रोकरेज कंपनी UBS ने शेअर्सच्या (Shares) किमतीत वाढ झाल्यानंतर आणि इंडिगोच्या सर्वात मोठ्या डीलनंतर इंडिगोचे लक्ष्य 2,690 रुपयांवरुन 3,300 रुपये केले आहे.

Indigo Flight
Indigo Airline: एअर इंडियाचा रेकॉर्ड मोडून इंडिगोने इतिहास रचला, एअरबसला दिली 500 विमानांची ऑर्डर

स्टॉक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी इंडिगो पूर्णपणे तयार असल्याचे यूबीएसच्या वतीने सांगण्यात आले. विदेशी ब्रोकरेजला जून तिमाहीचा EPS (प्रति शेअर कमाई) Q1 FY2024 मध्ये 82 रुपये अपेक्षित आहे, जो IndiGo च्या FY18 मधील विक्रमी-उच्च वार्षिक EPS पेक्षा 37 टक्क्यांनी जास्त आहे.

दरम्यान, भारतीय शेअर बाजार (Stock Market) बुधवारी नवा विक्रम गाठल्यानंतर बंद झाला. बुधवारी ट्रेडिंग सत्राअखेर बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 499 अंकांनी वाढून 63,915 वर बंद झाला. त्याचवेळी, NSE निफ्टी निर्देशांक 155 अंकांनी चढून 18,972 वर पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com