Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

India Richest Man: देशातील 'या' दिग्गज अब्जाधीशांकडे Private Jet, अन् बरचं काही...

India Richest Man List 2022: भारतातील श्रीमंतांनी परदेशात जाण्यासाठी त्यांच्या खासगी जेटचा वापर सुरु केला आहे.

दैनिक गोमन्तक

India Richest Man: भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अनेक दिग्गज उद्योगपतींची नावे समाविष्ट आहेत. अशावेळी भारतातील श्रीमंतांनी परदेशात जाण्यासाठी त्यांच्या खासगी जेटचा वापर सुरु केला आहे, त्यामुळे खासगी विमानांकडे कल खूप वाढला आहे. यासोबतच गेल्या काही वर्षांत भारतातील श्रीमंतांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे.

या दिग्गजांचा या यादीत समावेश

यावेळी भारतातील (India) श्रीमंतांनीही युरोप-अमेरिकेसारख्या देशांत लांबच्या प्रवासासाठी खासगी जेटचा वापर सुरु केला आहे. अदानी ग्रुप (Adani Group), सीरम इन्स्टिट्यूट, पूनावाला आणि सन टीव्ही यासारख्या अनेक दिग्गजांचा या यादीत समावेश आहे.

अदानीकडे हे विमान आहे

अदानी ग्रुपचे गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याकडे बॉम्बार्डियर ग्लोबल 7500 विमान आहे. या विमानाची किंमत सुमारे 5.6 कोटी रुपये आहे. याशिवाय सन टीव्हीने यावर्षी बॉम्बार्डियर ग्लोबल 7500 विमान खरेदी केले आहे, ज्याची किंमत सुमारे $75 दशलक्ष आहे.

जिंदाल आणि हिरो ग्रुपची निवड काय?

याशिवाय जिंदाल ग्रुपचे नवीन जिंदाल यांच्याकडे GulfStream G650ER आहे. त्याची रेंज सुमारे 7000 नॉटिकल मील आहे. याशिवाय Hero Group कडे Falcon 8X आहे, त्याची रेंज देखील सुमारे 7000 नॉटिकल मील आहे.

प्रवास सुलभ करण्यासाठी

आदर पूनावाला यांनी सांगितले की, यूके आणि युरोपला जाण्यासाठी सुमारे 9 ते 10 तास लागतात, त्यामुळे मी हे विमान खरेदी केले आहे, जेणेकरुन प्रवास सुकर करता येईल.

जाणून घ्या श्रीमंत लोक खाजगी जेटकडे का जात आहेत

सध्या व्यवसायाचे जागतिकीकरण होत आहे, त्यामुळे भारतात राहणारे श्रीमंत लोक खाजगी विमाने खरेदी करुन त्यातून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. याशिवाय केमन आयलंड, अमेरिका, सॅन मारिनो यांसारख्या देशांमध्ये भारतातील अनेक श्रीमंत लोकांची विमाने नोंदणीकृत आहेत. याशिवाय अनेक देशांमध्ये यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही.

नेट वर्थ किती वाढली

जर या श्रीमंतांच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, नाइट फ्रँकच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या यावेळी 19 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय त्यांच्या संपत्तीत 21.4 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यानंतर ती 384 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

SCROLL FOR NEXT