

तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या दररोज नवनवीन प्रयोग होत आहेत, मात्र Honor कंपनीने आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका करण्याचे ठरवले आहे. येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी कंपनी आपला बहुप्रतिक्षित 'Honor Win' हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनची सर्वात मोठी ओळख म्हणजे यात दिलेली १०,०००mAh ची महाकाय बॅटरी. एवढ्या मोठ्या क्षमतेची बॅटरी आणि प्रगत प्रोसेसरमुळे हा फोन गेमिंग शौकीनांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
हॉररने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, या फोनमध्ये केवळ मोठी बॅटरीच नाही, तर ती चार्ज करण्यासाठी १००W चे वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ८०W चे वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान दिले आहे. म्हणजेच, १०,०००mAh सारखी मोठी बॅटरी असूनही हा फोन काही मिनिटांतच पूर्ण चार्ज होईल. या बॅटरीमुळे युजर्सना वारंवार चार्जर शोधण्याची गरज भासणार नाही, विशेषतः प्रवासात असणाऱ्या लोकांसाठी हा फोन गेमचेंजर ठरू शकतो.
Honor Win मध्ये क्वालकॉमचे सर्वात शक्तिशाली 'Snapdragon 8 Elite Gen 5' प्रोसेसर वापरण्यात आले आहे. या शक्तिशाली इंजिनला साथ देण्यासाठी फोनमध्ये १६ जीबी रॅम आणि अतिरिक्त १६ जीबी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय मिळू शकतो.
कंपनीचा दावा आहे की, युजर्स या फोनवर सलग ५ तास कोणतीही अडचण किंवा फ्रेम ड्रॉप न होता हेवी गेमिंग करू शकतात. तसेच यामध्ये LPDDR5x Ultra RAM तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यामुळे फोनचा वेग कमालीचा असेल.
या स्मार्टफोनमध्ये ६.८३ इंचाचा ओलेड (OLED) डिस्प्ले असून तो १.५K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे, गुळगुळीत अनुभवासाठी १८५Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून त्यात टेलिफोटो लेन्सचाही समावेश आहे.
हा फोन अतिशय स्लिम डिझाइनमध्ये (१.४ मिमी जाडी) येणार असून तो पांढरा, निळा आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल. सध्या हे लाँचिंग चीनमध्ये होणार असून, भारतीय बाजारपेठेत हा फोन कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.