Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

खूशखबर! Vande Bharat Train मधून प्रवास करत असाल तर द्यावे लागणार इतके भाडे

Indian Railways Update: वंदे भारत एक्स्प्रेसबाबत रेल्वे विभागाने मोठी माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेसबाबत रेल्वे विभागाने मोठी माहिती दिली आहे. रेल्वेने नुकतेच तिसऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. तुम्हीही या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला किती भाडे द्यावे लागेल हे जाणून घ्या. रेल्वे विभागाने भाड्याची यादी जारी केली आहे.

2 ट्रेन आधीच धावत आहेत

देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गांधीनगर-मुंबई दरम्यान रेल्वेने चालवली जाणार आहे. यापूर्वी पीएम मोदींनी फेब्रुवारी आणि ऑक्टोबर 2019 मध्ये 2 ट्रेनचे उद्घाटनही केले आहे. या 2 ट्रेन नवी दिल्ली (Delhi) ते वाराणसी (Varanasi) आणि कटरा दरम्यान धावतात.

किती अंतर किती वेळात कापले जाते

गांधीनगर-मुंबई (Mumbai) एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे प्रवासी सुमारे 540 किमीचे अंतर 6 तास 30 मिनिटांत कापतात. त्याच वेळी, वंदे भारत 2.0 129 सेकंदात 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

रविवारी ट्रेन धावणार नाही

ही ट्रेन रविवार वगळता सर्व दिवस चालणार आहे. गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे.

वंदे भारत 2.0 मध्ये किती सिट्स आहेत?

या ट्रेनमध्ये जवळपास 16 डबे आहेत, ज्यामध्ये 1128 प्रवासी बसून प्रवास करु शकतात. या ट्रेनमध्ये प्रवाशांना एसी चेअर कार (CC) आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) सीटची सुविधा उपलब्ध असेल, असे रेल्वेने सांगितले आहे. जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला सीटमध्ये 180 डिग्री फिरण्याची सुविधा देखील मिळेल.

रु.चे रेल्वे तिकीट किती आहे?

जर भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई आणि गांधीनगरला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी चेअर क्लासमध्ये 1,385 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवासासाठी 2,505 रुपये आकारले जातील. जर आपण प्रवासाच्या मूळ भाड्याबद्दल बोललो तर ते गांधीनगर ते मुंबई 974 रुपये आणि मुंबई ते गांधीनगर 975 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT