Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways Reduces Fare: प्रवाशांसाठी खूशखबर! रेल्वे देणार भाड्यात मोठी सवलत; ज्येष्ठ नागरिकांचे बल्ले-बल्ले

Indian Railways Update: भारतीय रेल्वेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या, गेल्या एका वर्षात रेल्वेला किती महसूल मिळाला आहे

Manish Jadhav

Indian Railways Reduces Fare: भारतीय रेल्वेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या, गेल्या एका वर्षात रेल्वेला किती महसूल मिळाला आहे.

अधिकृत आकडेवारी जाहीर करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात 2.40 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे.

हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 49,000 कोटी रुपये अधिक आहे. रेल्वे मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे.

रेल्वेच्या महसुलात वाढ झाल्यानंतर अश्विनी वैष्णव पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सूट देऊ शकतात, असे मानले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने एक निवेदन जारी केले

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मालवाहतुकीतून 2022-23 मध्ये 1.62 लाख कोटी रुपयांचा महसूल वाढला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15 टक्के अधिक आहे.

महसूल 63,300 कोटींवर पोहोचला

भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवासी महसूल वार्षिक 61 टक्क्यांनी वाढून 63,300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, तीन वर्षांनंतर भारतीय रेल्वे निवृत्ती वेतनाचा खर्च भागवू शकली आहे. वर्षानुवर्षे, रेल्वेने आपल्या पेन्शन दायित्वाचा काही भाग उचलण्यासाठी वित्त मंत्रालयाशी संपर्क साधला होता.

रेल्वेने खर्च कमी केला

महसूल वाढवण्याच्या आणि खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे ऑपरेटिंग रेशो 98.14 टक्क्यांवर आणण्यात मदत झाली आहे. हे सुधारित उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे.

निवेदनानुसार, सर्व महसुली खर्च पूर्ण केल्यानंतर, अंतर्गत स्त्रोतांकडून भांडवली गुंतवणुकीमुळे (Investment) रेल्वेने 3,200 कोटी रुपये कमावले आहेत.

रेल्वे रोज किती मालवाहतूक करते

भारतीय रेल्वे दररोज सुमारे 9,141 मालगाड्या चालवते, ज्या देशाच्या कानाकोपऱ्यातून माल घेऊन जातात. त्यांच्यामार्फत दररोज सुमारे 20.38 कोटी टन मालाची वाहतूक होते. भारतीय रेल्वे 450 किसान रेल सेवा देखील चालवते, ज्याद्वारे दररोज 1.45 लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक केली जाते.

पूर्वी रेल्वे भाड्यात सवलत देत असे

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सवलत मिळते. यासोबतच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांना या सूटशिवाय अनेक प्रकारच्या सवलती मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT