Indian Railways Hydrogen Trains: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. देशातील सुमारे 150 शहरे वंदे भारत ट्रेनने जोडण्याच्या घोषणेनंतर आता रेल्वेमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, भारतीय रेल्वेने हायड्रोजन ट्रेनची तयारी पूर्ण केली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत देशात हायड्रोजन ट्रेन येईल असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. म्हणजेच ही गाडी येण्यास वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
रेल्वेची नवीन हायड्रोजन ट्रेन सध्या 8 हेरिटेज मार्गांवर चालवली जाणार आहे. देशातील पर्यटन आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आहे. याबाबत रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. हायड्रोजन ट्रेनमध्ये (Hydrogen Train) प्रवास करणे प्रवाशांसाठी एक वेगळा अनुभव असेल.
नव्याने कार्यरत असलेल्या हायड्रोजन गाड्या 1950-60 च्या दशकात डिझाइन केलेल्या गाड्यांची जागा घेतील अशीही अपेक्षा आहे. 'हायड्रोजन फॉर हेरिटेज' या नावाने हायड्रोजन ट्रेन्सबाबत रेल्वे मंत्रालयाने एक प्रकल्प सुरु केला आहे. वास्तविक, पर्यटन (Tourism) आणि हरित ऊर्जेला चालना देण्याच्या उद्देशाने रेल्वे हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा विचार करत आहे. सध्या हेरिटेज मार्गावर हायड्रोजन ट्रेन (Train) चालवण्याची तयारी सुरु आहे.
माथेरान हिल रेल्वे
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
कालका शिमला रेल्वे
कांगडा व्हॅली
बिलमोरा वाघाई
महू पाताळपाणी
निलगिरी माउंटन रेल्वे
मारवाड-देवगड मदरिया
रेल्वेकडून सांगण्यात आले की, हायड्रोजन ट्रेन चालवण्यासाठी सध्याच्या ट्रेनच्या इंजिन आणि कोचमध्ये अनेक आवश्यक बदल करण्यात आले आहेत. कोचमध्ये प्रोपल्शन युनिट बसवण्यात येणार आहे. याशिवाय या डब्यांमध्ये व्हिस्टोडियम कोच बसवण्यात येणार आहेत. व्हिस्टोडियम कोचमधून या मार्गांवर प्रवास केल्यास एक वेगळा अनुभव मिळेल. याआधीही रेल्वेकडून काही मार्गांवर व्हिस्टोडियम डबे बसवण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.