Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: करोडो प्रवाशांसाठी खूशखबर, आता ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशांना मिळणार मोठी रक्कम!

Indian Railways New Rules: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा ट्रेन अनेकदा रद्द होत असेल, तर प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही.

Manish Jadhav

Indian Railways New Rules: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा ट्रेन अनेकदा रद्द होत असेल, तर प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही. रेल्वेने एक नवा नियम जारी केला आहे, ज्यामध्ये ट्रेन रद्द केल्यानंतरही तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे.

याबाबतची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या एका नवीन नियमाबद्दल सांगत आहोत.

रेल्वेने ही माहिती दिली

रेल्वे विभागाने केलेल्या घोषणेनुसार, जर तुम्ही प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुम्हाला तिकीट बुक करताना योग्य मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यासह, द्वितीय श्रेणीमध्ये तिकीट बुक केल्यानंतर, तुम्ही तुमचे पीएनआर स्टेटस तपासणे आवश्यक आहे.

पीएनआर तपासताना तुम्हाला '‘Route class deleted/booking not allowed as given class for the route is deleted’' असे आढळल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील.

नवीन रिफंड प्रणाली सुरु केली

यासोबतच, जर तुम्ही एजंटद्वारे तिकिटे बुक केली असतील, तर अशा तिकिटांसाठी नवीन ओटीपी-आधारित रिफंड सिस्टम सुरु करण्यात आली आहे. याद्वारे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आरक्षित ई-तिकिटांसाठी पारदर्शक आणि परतावा प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.

एजंटद्वारे तिकीट बुक केल्यास पूर्ण पैसे मिळतील

ही नवीन प्रणाली IRCTC ने सुरु केली आहे, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पैसे परत मिळवू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. परतावा रक्कम मिळविण्यासाठी, तुम्हाला एजंटसोबत OTP शेअर करावा लागेल.

या सुविधेद्वारे, एजंटला प्रवाशाने रद्द केलेले तिकीट किंवा प्रतीक्षा यादीतून राहिलेल्या तिकीटाची अचूक माहिती कळेल आणि तुम्हाला तिकीटाचे पैसे परत मिळतील.

परतावा प्रक्रिया सुलभ केली

ही सुविधा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कॅन्सल रिफंड प्रोसेस सुलभ आणि सोपी करणे, जेणेकरुन प्रवाशांना (Passengers) एजंटद्वारे रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम वेळेवर मिळू शकेल. रद्द केलेल्या तिकिटांसाठी किंवा पूर्णपणे प्रतीक्षा यादीतील तिकिटांसाठी OTP-आधारित परतावा केवळ IRCTC अधिकृत एजंटद्वारे तिकीट बुक केल्यासच प्रक्रिया केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

SCROLL FOR NEXT