Indian Railways: अश्विनी वैष्णव यांची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे देणार 'ही' मोठी भेट!

Indian Railways Latest News: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात जी सूट मिळत होती ती लवकरच बहाल केली जाऊ शकते.
Ashwini Vaishnav
Ashwini VaishnavDainik Gomantak

Indian Railways Senior Citizen Concession: ज्येष्ठ नागरिकांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात जी सूट मिळत होती ती लवकरच बहाल केली जाऊ शकते. खरे तर, कोविड महामारीच्या काळात खराब आर्थिक स्थिती पाहता, रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह इतर सर्वांसाठी भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती.

कोरोना महामारीपूर्वी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 50 टक्के सूट मिळायची. आता कोविड-19 चा धोका कमी होऊन आणि देशात इतर सर्व प्रकारची कामे पूर्णत: सामान्य झाल्यानंतरही हा दिलासा ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) दिला गेला नाही.

Ashwini Vaishnav
Indian Railways: भारतीय रेल्वेची कमाल, बनवणार 'बाहुबली' इंजिन; असे करणारा जगातील सहावा देश

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले

दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 'रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट पूर्ववत करु शकते.'

त्यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतीय रेल्वेने (Indian Railways) 2019-20 मध्ये प्रवासी तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, जी प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती सुमारे 53 टक्के इतकी सवलत आहे.

तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले. रेल्वे अजूनही या विषयावर विचार करत आहे, परंतु आपल्या नियमांमध्ये रेल्वे काही बदल करु शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे.

Ashwini Vaishnav
Indian Railway: खुशखबर! रेल्वेच्या वेटिंग तिकीटाचा त्रास संपणार; AI देणार कन्फर्म तिकीट

त्याचवेळी, संसदीय पॅनेलने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सूट पुनर्संचयित करण्याची शिफारस देखील केली आहे.

दुसरीकडे, अनारक्षित सामान्य तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने एक खास अ‍ॅप लाँच केले आहे. आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तिकीट काउंटरची संख्या कमी असल्याने अनेक वेळा प्रवाशांना तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत. आता ही समस्या संपली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com