Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: भारतीय रेल्वेची कमाल, बनवणार 'बाहुबली' इंजिन; असे करणारा जगातील सहावा देश

Indian Railways: गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन बनवत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत या इंजिनांची निर्मिती केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railways: गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन बनवत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत या इंजिनांची निर्मिती केली जात आहे. या शक्तिशाली इंजिनांची खास गोष्ट म्हणजे, त्यांची क्षमता 12 हजार हॉर्स पॉवर आहे.

भारताशिवाय जगात असे 5 देश आहेत, जे तितक्याच किंवा जास्त हॉर्स पॉवर क्षमतेचे रेल्वे इंजिन बनवतात. रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडन या यादीत आहेत.

दरम्यान, फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने ही इंजिने देशात बनवली जात आहेत. ही इंजिने बिहारमधील मधेपुरा येथे बनवली आहेत. WAG-12 B नावाची ही इंजिने 180 टन वजनाची आहेत. आतापर्यंत अशी 100 शक्तिशाली इंजिन भारतात बनवली गेली आहेत. अजून 800 अशी इंजिन बनवायची आहेत.

इंजिनची खासियत जाणून घ्या

हे इंजिन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावू शकते. त्याच्या मदतीने, भारतातील मालगाड्यांचा सरासरी वेग आणि भार वाहून नेण्याची क्षमता सुधारत आहे. ही इंजिने ट्विन बो-बो डिझाइनची आहेत.

या रेल्वे इंजिनचा एक्सल लोड 22.5 टन आहे, जो 25 टन पर्यंत वाढवता येतो. विशेष म्हणजे, हे इंजिन जास्त उंचीच्या भागातही माल वाहून नेऊ शकते. तसेच, भार कमी झाल्यास दोनपैकी एक इंजिन बंद करुनही काम करता येते.

तसेच, त्याची लांबी 35 मीटर असून त्यात 1000 लीटर उच्च कॉम्प्रेसर क्षमतेच्या दोन एमआर टाक्या बसवण्यात आल्या आहेत. हे लांब पल्ल्याचा भार सहजतेने हाताळण्यास देखील सक्षम आहेत. 17 हजार हॉर्सपॉवरपेक्षा जास्त क्षमतेची इंजिने रशियामध्ये (Russia) बनवली गेली आहेत, तर जर्मनीनेही 16 हजार हॉर्सपॉवरपेक्षा जास्त क्षमतेची इंजिने बनवली आहेत.

शिवाय, हे इंजिन भारतातील (India) अति उष्णता आणि आर्द्रता देखील सहन करु शकते. इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर (IGBT) आधारित प्रोपल्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह रीजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या वापरामुळे ऊर्जेच्या वापरात बचत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

England T20 World Record: अशक्य ते शक्य! इंग्रजांनी टी-20 मध्ये केल्या 300 धावा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद, पाहा Highlights

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT