Vande Bharat Train: भारतीय रेल्वे (Indian Railways Latest News) वंदे भारत संदर्भात एक मोठी योजना बनवत आहे. देशभरात या ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. सध्या देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. प्रवास स्वस्त व्हावा यासाठी सरकार सध्या वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच बसवण्याचा विचार करत आहे. स्लीपर कोचमुळे रेल्वेचे तिकीटही स्वस्त होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 200 किमी असू शकतो. या ट्रेनमधील (Train) स्लीपर कोच अॅल्युमिनियमचा वापर करुन बनवला जात आहे.
वृत्तसंस्थेनुसार, 4 देशी कंपन्यांसह विदेशी कंपन्याही या गाड्यांच्या बांधणीसाठी पुढे आल्या आहेत. पहिल्या 200 वंदे भारत ट्रेनमध्ये शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे आसनव्यवस्था असेल. सध्या या गाड्या ताशी 180 किमी वेगाने धावू शकतील.
रेल्वेने सांगितले आहे की, रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेचा विचार करुन ताशी 130 किमी वेगाने धावण्याची परवानगी मिळेल. यासोबतच चेअर कार ट्रेनही स्टीलच्या बनवल्या जातील.
रेल्वेने सांगितले आहे की, दुसऱ्या टप्प्यात 200 स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती करणार आहे. या गाड्या बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅकबाबतही काम सुरु आहे. यासोबतच सिग्नल आणि पुलाचेही काम सुरु आहे. दिल्ली-कोलकाता (Kolkata) आणि दिल्ली-मुंबई दरम्यान हे काम सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.