Sugar Price Dainik Gomantak
अर्थविश्व

साखरेचीही गोडी वाढणार, सरकार निर्यातीसंबधी घेऊ शकते मोठा निर्णय

सरकार या हंगामात 10 दशलक्ष टन साखरेची निर्यात मर्यादा निश्चित करू शकते

दैनिक गोमन्तक

देशांतर्गत बाजारात साखरेच्या ( Sugar) वाढत्या किमती पाहता केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. साखरेच्या निर्यातीला आळा घालण्यासाठी सरकार निर्यात ( Sugar Export) मर्यादा निश्चित करू शकते. सरकार या हंगामात 10 दशलक्ष टन साखरेची निर्यात मर्यादा निश्चित करू शकते, असा अंदाज लावला जात आहे. असे झाल्यास सरकार साखरेच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध लादण्याची सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. (Sugar Price Hike)

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण विभागानुसार, 23 मे रोजी देशांतर्गत बाजारात साखरेची सरासरी किंमत 41.58 रुपये प्रति किलो होती . तर कमाल किंमत 53 रुपये प्रति किलो आणि किमान किंमत 35 रुपये प्रति किलो आहे.

महागाईला आळा घालण्याची तयारी

मोदी सरकारने गहू आणि मैद्याच्या वाढत्या किमती पाहता गव्हाच्या निर्यातीवर आधीच बंदी घातली आहे. आता देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीत मोठी झेप असताना सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत असून, त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

भारत हा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार

भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. त्याच वेळी, ब्राझील हा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. खरं तर, ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान, भारताने 71 लाख टन साखर निर्यात केली आहे, जी 64 टक्के जास्त आहे. मे महिन्यात 8 ते 10 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. 2021-22 मध्ये 90 लाख साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. तर यापूर्वी 72 लाख टन साखर निर्यात झाली होती.

चिनी कंपन्यांच्या शेअर्सना धोका

साखरेच्या निर्यातीवर अंकुश लावल्या नंतर साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सना जबरदस्त फटका बसला आहे. दालमिया भारत शुगरच्या शेअरमध्ये 6.99 टक्के, शक्ती शुगर्सच्या शेअरमध्ये 6.30 टक्के, श्री रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये 6.66 टक्के, बलराम चिनीच्या शेअरमध्ये 6.66 टक्क्यांनी घट झाली आहे. 4.94 टक्के घसरण झाल्याचे बघायला मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT