Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: मुलींसाठी आनंदाची बातमी, सरकार देतेय तब्बल 75,000 रुपये!

Government Scheme For Girl Child: आता तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्हाला 5000 रुपये मिळतील. यासोबतच तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर सरकार तुम्हाला 75,000 रुपये देईल.

Manish Jadhav

Government Scheme For Girl Child: देशभरातील महिला आणि मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मुलींबाबत अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

आता तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्हाला 5000 रुपये मिळतील. यासोबतच तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर सरकार तुम्हाला 75,000 रुपये देईल. सरकारच्या या योजनेचा लाभ कोणाला मिळणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूर्ण 75,000 रुपये मिळतील

महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींसाठी विशेष योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलीला 75 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात (Budget) लेकी लाडकी योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला मुलीच्या जन्मानंतर 18 वर्षांपर्यंत आर्थिक मदत मिळेल.

आर्थिक मदत कशी मिळेल-

>> लेक लाडली योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर मिळणार पूर्ण 5000 रुपये.

>> यानंतर तुमची मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात जाईल तेव्हा तिला 4000 रुपये मिळतील.

>> दुसरीकडे, तुमची मुलगी जेव्हा सहावीत असेल तेव्हा तिला 6000 रुपये मिळतील.

>> 11वी वर्गात 8000 रुपये मिळणार.

>> ती 18 वर्षांची झाली तर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75,000 रुपये मिळतील.

लाभ कोणाला मिळणार?

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळणार आहे, ज्यांच्याकडे निळे आणि केशरी रंगाचे राशनकार्ड (Ration Card) असेल. मुलींच्या शिक्षणासाठी सरकार ही आर्थिक मदत करत आहे. यामध्ये मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत राज्य शासनाकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे.

काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य-

>> योजनेअंतर्गत मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच झाला पाहिजे.

>> महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंबेच पात्र असतील.

>> योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पालकांचे आधारकार्ड, मुलीचा जन्म दाखला, पिवळ्या आणि केशरी रंगाचे राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, बँक खाते आवश्यक असेल. पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT