Government Scheme: मोदी सरकारने महिलांना दिली मोठी भेट, मिळणार पूर्ण 15 हजार रुपये!

Modi Government Scheme: महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने देशातील महिलांना विशेष भेट दिली आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Central Government Scheme For Women: महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने देशातील महिलांना विशेष भेट दिली आहे.

यापुढे महिलांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. मोदी सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरु केले आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक विशेष फायदे मिळतील. आज आम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो हे सांगणार आहोत.

महिला सन्मान बचत पत्र MSSC काय आहे?

सरकारने याआधीही महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, परंतु महिला सन्मान बचत पत्र या सर्वांपेक्षा खूप वेगळे आहे. या योजनेत 2025 पर्यंत कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेत 2 लाख रुपये जमा करत असेल तर तिला 7.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे, यामध्ये कोणताही कर नाही. या योजनेत तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

Prime Minister Narendra Modi
PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेत मिळणारी रक्कम वाढणार? कृषीमंत्र्यांनी दिले उत्तर

महिला सन्मान बचत पत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

महिला सन्मान बचत पत्राचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जा आणि तिथे आवश्यक कागदपत्रे जमा करा. यामध्ये लोक ऑनलाइन अर्जही करु शकतात.

महिला सन्मान बचत पत्र मिळविण्यासाठी महिलेच्या नावावर आधार कार्ड, पॅनकार्ड आवश्यक असेल. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करावे. आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील नाव एकच आहे, का याची खात्री करा. याशिवाय, फॉर्म भरताना ओटीपी देण्यासाठी महिलेला (Woman) मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीची आवश्यकता असू शकते.

महिला सन्मान बचत पत्रात कर सूट

महिला सन्मान बचत पत्रात 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये जमा करा आणि नंतर आवश्यकतेनुसार तुम्ही ते काढू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

Prime Minister Narendra Modi
Government Scheme: सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदराबाबत मोठी अपडेट, सरकारने केली घोषणा!

या योजनेचे फायदे आणि प्रतिबंध काय आहेत

फायद्यांसोबतच यामध्ये काही बंधने देखील आहेत, जसे की- या योजनेत व्याज चांगले आहे, परंतु गुंतवणुकीची (Investment) मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या महिलेला किंवा मुलीला त्यात जास्त पैसे गुंतवायचे असतील तर ती करु शकत नाही. याशिवाय, ही दोन वर्षांची बचत योजना असेल, तुम्ही या योजनेत फक्त 2025 पर्यंत गुंतवणूक करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com