Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

Pm Kisan: शेतकर्‍यांसाठी गूड न्यूज, सरकार देतेय 30,000 रुपयांचा बोनस; पण...

Indian Farmers News: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात सरकारने लाखो शेतकऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Indian Farmers News: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात सरकारने लाखो शेतकऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. पीएम किसान योजने (पीएम किसान सन्मान निधी) व्यतिरिक्त सरकारने शेतकऱ्यांना 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. हे पैसे लवकरच तुमच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. तुमच्याकडे एक एकर शेती असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळतील. हे पैसे शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिले जातील. तसेच, तुम्ही जास्तीत जास्त 2 एकर क्षेत्रासाठी अर्ज करु शकता.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार बोनस?

हे पैसे देण्याची घोषणा राज्य सरकारने (Government) केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन शेतकऱ्यांना पुढील हंगामात पिकासाठी खते खरेदी करता येतील.

5 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याचा लाभ राज्यातील सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना (Farmer) मिळणार आहे. 2022 च्या ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाला मोठा फटका बसला असून, त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति 2 हेक्टर 15,000 रुपये बोनस दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, पीएम फसल विमा योजनेंतर्गत 16 लाख 86 हजार 786 शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून 6255 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक विशेष पावले उचलली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT