PM Kisan Scheme: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हे पैसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे केंद्र सरकारने वर्ग केले आहेत.
आत्तापर्यंत 8.42 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना (Farmer) 12 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. सध्या देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकरी या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.
मागील पॅटर्न पाहिल्यास, 1 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदींनी (PM Modi) दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. गेल्या वर्षी पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते. या अंतर्गत सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
>> तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
>> यानंतर Farmer Corner वर क्लिक करा.
>> आता तुम्ही येथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.
>> तुम्हाला येथे ई-केवायसी आणि जमिनीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
>> स्टेटसच्या पुढे 'yes' लिहिले असेल तर 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.
तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.