India Economy Dainik Gomantak
अर्थविश्व

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

India Economy: भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगान वाढत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक सकारात्मक भाकिते वर्तवली आहेत.

Manish Jadhav

India Economy: भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगान वाढत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक सकारात्मक भाकिते वर्तवली आहेत. भारत येणाऱ्या काळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या मते, भारत इतर आशियाई देशांच्या तुलनेत चांगल्या आर्थिक स्थितीत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे.

अशा परिस्थितीत भारत आपला रियल जीडीपी वाढ 7 टक्क्यांपर्यंत नेण्यास कसून तयारी करत आहे. भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चीनला मागे टाकेल. पण गेल्या दशकात भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्क्यांवर अडखळली होती. याचा अर्थ गेल्या दशकापेक्षा या दशकात भारतीय अर्थव्यवस्था मंदावू शकते. IMF आणि Nomura ने GDP वाढीचा अंदाज 3.9% वर्तवला आहे. यापूर्वी, यूएनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता की, ज्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था यावर्षी 6.9% ने वाढू शकते असे सांगितले होते.

अर्थव्यवस्थेच्या वाढीची ही कारणे असतील

दरम्यान, यावर्षी भारतीय व्यवसायात प्रचंड तेजी आली आहे. तसेच, सरकार विविध योजनांसाठी भरपूर निधी उपलब्ध करुन देत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात चांगला विकास होऊ शकतो. आदित्य बिर्ला कॅपिटलनुसार, व्यवसाय क्षेत्रात भारताचा भांडवली खर्च टू GDP रेश्यू 22-24E आर्थिक वर्षात 3% वाढला आहे, जो 9 वर्षातील 30% पेक्षा चांगला आहे.

मिडल क्लासची स्थिती सुधारली

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या मते, 1995 ते 2001 पर्यंत भारतातील मध्यमवर्गाचे उत्पन्न वार्षिक 6.3% वाढले आहे. मिडल क्लास वार्षिक 0.5 दशलक्ष रुपये कमावतो. मिडल क्लास ही कॅटेगरी एकूण लोकसंख्येच्या 31% आहे, जी 2031 पर्यंत 38% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 2047 पर्यंत अंदाजे 60% म्हणजेच सुमारे 263 दशलक्ष कुटुंबांना कव्हर करणे अपेक्षित आहे.

हे धोकेही वाढत्या अर्थव्यवस्थेसोबत येतात

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, पण त्यासोबत काही धोकेही निर्माण होत आहेत. भौगोलिक-राजकीय तणाव हे देखील यातील एक कारण आहे. सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धांसह जगभरातील अनेक देशांमध्ये धार्मिक आणि राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अशा स्थितीत भारतासह (India) जगासाठी ही चिंतेची बाब आहे. याशिवाय, जागतिक मंदी आणि चलनवाढ याचाही परिणाम जाणवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT