Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

Mapusa Minor Girls Rescue: उत्तर गोव्यात एक मोठी कामगिरी बजावली असून म्हापसा येथील एका हॉटेलमधून दोन मुलींची यशस्वी सुटका करण्यात आली
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यात मानवी तस्करी विरोधात सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शनिवारी (दि.१५) रात्री उशिरा केलेल्या महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेत, गोवा क्राईम ब्रांचने नोडल एनजीओ ARZ आणि ॲंटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) यांच्या सहकार्याने उत्तर गोव्यात एक मोठी कामगिरी बजावली असून म्हापसा येथील एका हॉटेलमधून दोन मुलींची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुलींना केले लक्ष्य

पोलीस सूत्रांनुसार, सुटका करण्यात आलेल्या या दोन्ही मुली पश्चिम बंगालच्या रहिवासी असून, त्यांना मानवी तस्करीचे बळी बनवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन तस्करांना अटक केली आहे. या कारवाईमुळे गोव्यात मानवी तस्करीचे जाळे अजूनही सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Goa Crime News
Goa Crime: रात्री होते सोबत, सकाळी पत्नी सापडली मृतावस्थेत; 12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात पतीला आधी कारावास, नंतर निर्दोष मुक्तता

मुली 'राज्य संरक्षण गृहात' दाखल

बचावकार्यानंतर, या मुलींना आवश्यक काळजी आणि संरक्षण देण्यासाठी राज्य संरक्षण गृहात (State Protective Home) दाखल करण्यात आले आहे. गोवा पोलीस आणि सहयोगी संस्थांच्या या संयुक्त कारवाईमुळे गोव्यात मानवी तस्करी रोखण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. क्राईम ब्रांच या अटक केलेल्या तस्करांची कसून चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Human Rights Commission Gratuity Refund
Goa Crime
Prostitution Racket Busted In Calangute
Goa Crime Branch Illegal Immigrant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com