'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

CM Pramod Sawant: प्रधानमंत्री विमा योजनेतून प्रत्येक कर्जधारकाचा विमा उतरावा. सहकार खात्याने हे परिपत्रक ताबडतोब काढावे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळीत सांगितले.
Goa CM Pramod Sawant Orders Action on ‘Pakistan Zindabad’ Banner
Pakistan Zindabad banner GoaDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: एकच व्यक्ती आपल्या परिपसरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये कर्ज घेऊन ते बुडवितो. त्यांची वृत्तीच कर्ज बुडविण्याची असल्याने आता यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही. सहकार खात्याने यापुढे अशा नवीन पारंपरिक सहकारी पतसंस्थांना परवानगी देऊ नये. उलट प्रत्येक सहकारी पतसंस्थेने प्रधानमंत्री विमा योजनेतून प्रत्येक कर्जधारकाचा विमा उतरावा. सहकार खात्याने हे परिपत्रक ताबडतोब काढावे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळीत सांगितले.

रवींद्र भवनमध्ये गोवा थ्रीफ्ट सहकारी संस्था मर्यादित व इतर विविध सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, उपाध्यक्ष कृष्णा कुडणेकर, सहकार खात्याचे निबंधक आशुतोष आपटे, प्रमुख वक्ते म्हणून बुलढाणा सहकारी पतसंस्थेचे सीईओ शिरीषजी देशपांडे व इतरांची उपस्थिती होती.

Goa CM Pramod Sawant Orders Action on ‘Pakistan Zindabad’ Banner
'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

दरम्यान, सहकार सप्ताहाच्या कार्यक्रमात राज्यभरातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे २०० च्या वर विद्यार्थ्यांचा यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच काही निवडक सहकार क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात शिरीषजी देशपांडे यांनी उपस्थित त्यांना सहकार क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले.

Goa CM Pramod Sawant Orders Action on ‘Pakistan Zindabad’ Banner
Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

‘स्वयंपूर्ण गोवा’ चा सकारात्मक परिणाम

स्वयंपूर्ण गोव्याचा नारा दिल्यानंतर प्रथमच दसरोत्सवात झेंडू फुलांची बाहेरून आयात ५० टक्क्यांवर आली. यावरूनच गोव्यातील शेतकरीही शेतात उतरून उत्पादन घ्यायला लागल्याचे दिसून आले. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेखाली गोव्यात भाजी लागवड, फुल, डेअरी, मासळी उत्पादन भरपूर वाढले आहे. याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com