UPI Transactions  Dainik Gomantak
अर्थविश्व

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

UPI Transactions Record: भारतामध्ये डिजिटल पेमेंटची क्रांती दिवसेंदिवस नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असून 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' म्हणजेच (UPI) या क्रांतीचे नेतृत्व करत आहे.

Manish Jadhav

UPI Transactions Record : भारतामध्ये डिजिटल पेमेंटची क्रांती दिवसेंदिवस नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असून 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' म्हणजेच (UPI) या क्रांतीचे नेतृत्व करत आहे. मार्च 2026 मध्ये UPI ने पुन्हा एकदा आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात तब्बल 22.64 अब्ज व्यवहारांची नोंद झाली. फेब्रुवारी 2026 मध्ये हा आकडा 20.39 अब्ज इतका होता, जो मार्चमध्ये मोठ्या फरकाने वाढला. हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की, भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आता वेगाने 'कॅशलेस' होण्याकडे वाटचाल करत असून सामान्य जनतेचा डिजिटल व्यवहारांवरील विश्वास अधिक दृढ झाला.

केवळ व्यवहारांच्या संख्येतच नव्हे, तर व्यवहारांच्या एकूण मूल्यामध्येही (Total Value) मोठी वाढ दिसून आली. मार्च महिन्यात UPI च्या माध्यमातून एकूण 29.53 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 26.84 लाख कोटी रुपये इतका होता. यावरुन असे लक्षात येते की, केवळ छोट्या पेमेंटसाठीच नाही, तर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठीही नागरिक आता डिजिटल माध्यमाचा सर्रास वापर करत आहेत.

सरासरीचा विचार केला तर मार्च महिन्यात दररोज सुमारे 73 कोटी व्यवहार झाले, ज्यांचे रोजचे सरासरी मूल्य 95,243 कोटी रुपये राहिले. वार्षिक आधारावर पाहिले तर व्यवहारांच्या संख्येत 24% आणि मूल्यामध्ये 19% इतकी नेत्रदीपक वाढ नोंदवण्यात आली.

डिजिटल इंडिया मोहिमेला मिळत असलेल्या या गतीवर वित्तीय सेवा विभागाने (DFS) समाधान व्यक्त केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी डिजिटल पेमेंटचा अवलंब करावा, असे आवाहन केले. NPCI ने विकसित केलेले UPI तंत्रज्ञान आज देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट सिस्टिम बनले. मोबाईल ॲप्स आणि बँकिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या झटपट पैसे हस्तांतरणाच्या सुविधेमुळे हे तंत्रज्ञान ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचले. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरुमपर्यंत सर्वत्र UPI चा वाढता वापर भारताच्या बदलत्या आर्थिक स्थितीचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT