डिजिटल इंडियाची झलक! देशात ऑगस्ट मध्ये 1 हजार कोटींपेक्षा जास्त UPI Transactions

UPI Payment: ऑगस्ट 2021 मध्ये UPI द्वारे व्यवहारांची संख्या केवळ 350 कोटी होती, जी दोन वर्षांत जवळपास तीन पटीने वाढली आहे.
The Unified Payment System (UPI) crossed the Rs 1,000 crore transactions for the first time in India in August.
The Unified Payment System (UPI) crossed the Rs 1,000 crore transactions for the first time in India in August.Dainik Gomantak
Published on
Updated on

The Unified Payment System (UPI) crossed the Rs 1,000 crore transactions for the first time in India in August:

युनिफाइड पेमेंट्स सिस्टीम (UPI) द्वारे ऑगस्टमध्ये देशभरात 1 हजार कोटींपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स झाले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, 31 ऑगस्ट रोजी UPI ट्रान्झॅक्शन्स 1 हजार 58 कोटींवर पोहोचले आहेत.

ऑगस्टमध्ये झालेल्या या ट्रान्झॅक्शन्सचे एकूण मूल्य 15 लाख 18 हजार 456.4 कोटी रुपये होते. जुलैमध्ये UPI ट्रान्झॅक्शन्सची संख्या 996.4 कोटी होती तर जूनमध्ये ती 933 कोटी होती. NPCI ही देशातील सर्व रिटेल पेमेंट सिस्टमसाठी शिखर संस्था संस्था आहे.

परदेशातही UPI चा डंका

ऑगस्ट 2021 मध्ये UPI द्वारे व्यवहारांची संख्या केवळ 350 कोटी होती, जी दोन वर्षांत जवळपास तीन पटीने वाढली आहे. आता देशातील बहुतांश व्यापारी आणि ग्राहकांनी UPI ला स्वीकारण्यास सुरुवात केली आहेत. त्यामुळे याचा वापरही वाढत चालला आहे.

आज करोडो रुपये कमावणारे व्यापारी असोत किंवा भाजीपाला विकणारे छोटे-मध्यम दुकानदार असोत, सगळे UPI द्वारे व्यवहार करत आहेत.

विशेष म्हणजे आजच्या घडीला जगातील 35 हून अधिक देशांना आता भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे. अलिकडेच भूतान, नेपाळ, सिंगापूर आणि यूएई ने यूपीआयचा वापर सुरू केला आहे. आता लवकरच जपानचाही यामध्ये समावेश होणार आहे.

The Unified Payment System (UPI) crossed the Rs 1,000 crore transactions for the first time in India in August.
Success Story: आजारी आई अन् 40 लाखांचे कर्ज... संकटांवर मात करत यूट्यूबर कमावतोय लाखो रुपये

कोरोनापपासून UPI चा वापर वाढला

2016-17 मध्ये नोटाबंदी दरम्यान, भारत सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले. 2016 मध्ये मोदी सरकारने UPI-BHIM लाँच केले. नोटाबंदीनंतर लोक मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंटवर अवलंबून राहू लागले.

यानंतर, कोविड महामारीच्या काळात, देशातील बहुतेक लोकांनी डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करण्यासाठी UPI ला पसंती दिली. आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात UPI चा वापर होत आहे.

The Unified Payment System (UPI) crossed the Rs 1,000 crore transactions for the first time in India in August.
कंटेंट क्रिएटर्सना दणका! YouTube ने हटवले भारतातील 19 लाख व्हिडिओ

परदेशी नागरीकांना UPI सुविधा

आरबीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये परदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीयांना भारतात असताना UPI वापरून पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

ही सुविधा G20 देशांमधील प्रवाशांना निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (बेंगळुरू, मुंबई आणि नवी दिल्ली) त्यांच्या पेमेंटसाठी उपलब्ध केली होती.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे की सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE आणि UK या 10 देशांसाठी ही सुविधा मंजूर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com