FM Nirmala Sitaraman Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Economy: भारत लवकरच बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार; अर्थ मंत्रालयाचा अंदाज

Manish Jadhav

Economy Review 2024: आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024 सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि अर्थ मंत्रालय या कामात व्यस्त आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच सूचित केले आहे की, यावेळी कोणतीही मोठी घोषणा होण्याची शक्यता कमी आहे आणि यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 2030 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 7 ट्रिलियन डॉलर्सची होऊ शकते. अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षांत 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते. यासह, ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. तथापि, सरकारने 2047 पर्यंत भारत 'विकसित देश' बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

दरवर्षी सामान्य अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते, परंतु यावेळी अर्थ मंत्रालयाने पुनरावलोकन म्हणून 'द इंडियन इकॉनॉमी: अ रिव्ह्यू' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणूक निकालानंतर नवे सरकार सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. आर्थिक सर्वेक्षण सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी सादर केले जाईल.

अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही अनंत नागेश्वरन म्हणाले- हा अहवाल आर्थिक सर्वेक्षणाची जागा घेत नाही. "सार्वत्रिक निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी हे येईल." मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक सुधारणांमध्ये सातत्य आल्याचे अहवालात सूचित केले आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या दोन टर्मचा लेखाजोखा देताना, हा 10 वर्षांचा प्रवास उत्तम भविष्य दर्शवतो.

दरम्यान, भारत आता $3.7 ट्रिलियन (अंदाजे FY24) सह पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अहवालानुसार, कोविड महामारी आणि कमकुवत अर्थव्यवस्थेचा वारसा असूनही मजबूत पुनर्प्राप्ती झाली. अहवालात म्हटले की- देशांतर्गत मागणी, खाजगी उपभोग आणि गुंतवणुकीत दिसून आलेली ताकद सरकारने गेल्या 10 वर्षांत राबवलेल्या सुधारणा आणि उपाययोजनांमुळे शक्य झाली आहे. सरकारी धोरणांमुळे उत्पादनाला चालना देण्यासाठी भौतिक आणि डिजिटल इन्फ्रा गुंतवणुकीसह पुरवठ्याची बाजू मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक वर्ष 2025 मध्ये नॉमिनल GDP 7% च्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. 5 जानेवारी रोजी सरकारने आर्थिक वर्ष 2024 मध्ये GDP 7.3% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. 2030 पर्यंत विकास दर 7 टक्क्यांहून अधिक होण्यास भरपूर वाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT