World Soil Day: चिंताजनक! 2045 पर्यंत पृथ्वीवर 40% कमी अन्न तयार होण्याची शक्यता; गोव्यासमोरही मोठी समस्या..

Goa Soil: आपले जवळजवळ सारे अन्न मातीतूनच येते. मात्र आज अनेक कारणांमुळे मातीच्या चांगल्या गुणांचा ऱ्हास होताना दिसतो आहे आणि याला कारण आम्ही मानवच आहोत.
World Soil Day | Goa Soil
World Soil Day | Goa Soil Dainik Gomantak
Published on
Updated on

मातीबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ अशासाठी असायला हवे की आपले अस्तित्वच मुळी मातीशी असलेल्या आपल्या संबंधावर अवलंबून आहे. आपले जवळजवळ सारे अन्न मातीतूनच येते. मात्र आज अनेक कारणांमुळे मातीच्या चांगल्या गुणांचा ऱ्हास होताना दिसतो आहे आणि याला कारण आम्ही मानवच आहोत. हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यातून मातीची गुणवत्ता आज हरवत चालली आहे.‌

2025 चा आजचा जागतिक माती दिन 'निरोगी शहरांसाठी निरोगी माती' या थीमचा पुरस्कार करतो. आपण मातीबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा बहुतेकदा आपण मातीला ग्रामीण भाग आणि निसर्गाशी जोडत असतो.

शहरातील मातीदेखील एक महत्त्वपूर्ण घटक आहे हे आपण क्वचितच विचारात घेतो.‌ शहरातील डांबरी रस्ते, इमारती आणि रस्त्यांखालची माती जर झिरपण्यायोग्य आणि वनस्पतीजन्य असेल तर पावसाचे पाणी शोषण्यास, तापमान नियंत्रित करण्यास, कार्बन साठवण्यास आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास ती मदत करू शकते.‌

मात्र माती जेव्हा सिमेंटने सील केली जाते तेव्हा शहरे पूर, अतिउष्णता आणि प्रदूषणामुळे असुरक्षित बनू शकतात. त्यामुळे शहरी जागांचा पुनर्विचार करण्यासाठी आणि त्याला निरोगी बनवण्यासाठी मातीच्या आरोग्याचा विचार करणेही खूप महत्त्वाचे आहे. 

गोव्यात चाललेल्या खाणकामामुळे आपल्याकडील मातीची धूप होण्याची शक्यता अधिक असते. मातीची धूप आणि खाणकामे यांचा मातीवर नकारात्मक परिणाम होत असला तरी तिची गुणवत्ता सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीसारखे उपाय आपण हाती घ्यायला हवेत.

World Soil Day | Goa Soil
Harvalem Multani Soil Mine : गोव्यासाठी गुड न्युज! हरवळेच्या खाणीत सापडली आयुर्वेदीक ‘मुलतानी माती'

आपली माती अधिक प्रमाणात 'लॅटरायटीक' असल्यामुळे मातीत पाणी धरून ठेवण्याची तिची क्षमता कमीच आहे‌ आणि तिच्यात पोषक घटकांची कमतरताही आहे.  अनेक ठिकाणी खाऱ्या पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे भातशेतीमधील मातीची गुणवत्ता खालावली गेली आहे.

शहरीकरण, मजुरीचा न परवडणारा खर्च अशामुळे सुपीक जमिनीचे मोठे भाग पडीक राहिले आहेत. या सार्‍या आपल्या गोव्यातील माती समोर उभ्या राहिलेल्या समस्या आहेत. मातीची गुणवत्ता जगभरच कमी होत चालली आहे.

World Soil Day | Goa Soil
World Soil Day 2022: काजू, भाताच्या उत्पादनासाठी गोव्याचीच माती का?

शंभर वर्षांपूर्वीच्या मातीत जी  पोषक तत्वे होती ती आज तुलनेने कमी झाली आहे. जर अशाच प्रकारे मातीतील पोषक तत्वांचा नाश होत गेल्यास 2045 पर्यंत पृथ्वी 40% कमी अन्न तयार करील अशी शक्यता आहे.

म्हणूनच निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणे आणि माती संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणे हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे बनले आहे. आजचा हा दिवस त्यासाठीच धोरणकर्त्यांपासून नागरिकापर्यंत सर्वांनाच मातीचा पुनर्विचार करण्यासाठी आवाहन करतो.

विवेक कोरगांवकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com