Indian Economy: ''5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी...'', PM मोदींनी गुजरातचे उदाहरण देऊन समजावले

Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. 2023 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहील.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. 2023 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षांसाठी 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी त्यांचे ध्येय तपशीलवार स्पष्ट केले. 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचा ट्रॅक रेकॉर्ड आपोआप बोलतो.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, ''जेव्हा मी 2001 मध्ये गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे 26 अब्ज डॉलर (2.17 लाख कोटी रुपये) होता. मी पंतप्रधान होण्यासाठी गुजरात सोडले तेव्हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा आकार 133.5 अब्ज डॉलर्स (11.1 लाख कोटी रुपये) झाला होता. आणि राबवलेल्या अनेक धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम म्हणून आज गुजरातची अर्थव्यवस्था सुमारे 260 अब्ज डॉलर्स (21.6 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.''

पीएम मोदी पुढे म्हणाले की, ''त्याचप्रमाणे 2014 मध्ये मी पंतप्रधान झालो तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलर्स (167 लाख कोटी रुपये) होती आणि 2023-24 च्या अखेरीस भारताचा जीडीपी 37.5 ट्रिलियन डॉलर (312 लाख कोटी पेक्षा जास्त असेल.) होईल. हा 23 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवितो की हे वास्तववादी लक्ष्य आहे.''

PM Modi
Indian Economy: अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर आनंदाची बातमी: सप्टेंबर तिमाहीत GDP एवढ्या टक्क्यांनी वाढला!

दरम्यान, विरोधकांच्या महागाईच्या आरोपाशी संबंधित एका प्रश्नावर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''कोरोना महामारी आणि जागतिक संघर्ष ज्याने जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. जगभरात मंदीचा दबाव निर्माण केला आहे, तरीही भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे. मोठ्या अडचणी, जागतिक संकटे, पुरवठा साखळीतील बिघाड आणि भू-राजकीय तणाव यांचा जगभरातील किमतींवर परिणाम झाला. असे असूनही, 2014-15 ते 2023-24 (नोव्हेंबरपर्यंत) सरासरी चलनवाढ केवळ 5.1 टक्के होती, तर मागील 10 वर्षांमध्ये (2004-14) ती 8.2 टक्के होती. मोदींनी विचारले की कोणती जास्त आहे, 5.1 टक्के महागाई की 8.2 टक्के महागाई?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com