Indian Economy Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Economy: गूड न्यूज! जपानला पछाडत भारत बनणार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; IMF रिपोर्टमधून खुलासा

World Fourth Largest Economy: पहलगाम हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट असताना भारतासाठी एक गूड न्यूज आली आहे. आयएमएफचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला, ज्यामध्ये भारत जपानला पछाडत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे सांगण्यात आले.

Manish Jadhav

Indian Economy Size: पहलगाम हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट असताना भारतासाठी एक गूड न्यूज आली आहे. आयएमएफचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला, ज्यामध्ये भारत जपानला पछाडत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे सांगण्यात आले. 2025 मध्ये भारत जीडीपीच्या बाबतीत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

आयएमएफने एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुकमध्ये ही माहिती देण्यात आली. अहवालानुसार, 2025 मध्ये देशाचा नॉमिनल जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. त्याचवेळी, जपानच्या जीडीपीचा आकार $4,186.431 अब्ज एवढा राहिल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जीडीपीमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान (Japan) भारताच्या पुढे आहेत.

भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था देखील बनू शकतो

आयएमएफच्या (IMF) अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकते. या काळात जीडीपीचा आकार 5,069.47 अब्ज डॉलर्स एवढा राहील. त्याचवेळी, 2028 मध्ये भारताच्या जीडीपीचा आकार $5,584.476 अब्ज एवढा राहील, तर या काळात जर्मनीच्या जीडीपीचा आकार $5,251.928 अब्ज राहण्याचा अंदाज आहे.

जीडीपी विकास दर 6.2 टक्क्यांवर घसरला

आयएमएफच्या अंदाजानुसार, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन 2025 पासून सुरु होऊन सुमारे एक दशकापर्यंत त्यांचे रँकिंग कायम ठेवू शकतात. आयएमएफने 2025 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. जानेवारीच्या आउटलुक अहवालात याआधी हा आकडा 6.5 टक्के होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे विकास दरात घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयएमएफच्या अहवालानुसार, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पुढील दोन वर्षांत 6 टक्के दराने वाढणारी ही जगातील एकमेव मोठी अर्थव्यवस्था असेल. आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, 'एप्रिल 2025 च्या वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुकमध्ये आम्ही जागतिक विकासदर 2.8 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आला असून 127 देशांमधील विकासदरात घट होईल, जो जागतिक जीडीपीच्या 86 टक्के वाटा आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT