PM Modi
PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Modi: ‘’मोदींची तिसरी टर्म आर्थिक विकासाचे नवे युग सुरु करण्यासाठी...’’; इंडिया फोरमच्या संस्थापकांनी व्यक्त केला विश्वास

Manish Jadhav

Indian Economy: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खूप खास ठरली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक प्रगतीचे अनेक उच्चांक गाठले. या दहा वर्षातच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. याशिवाय, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाही बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पायाभूत क्षेत्रातील विकासाबरोबर आयटी क्षेत्रातही नवे रेकॉर्ड स्थापित करत आहे. जागतिक स्तरावर भारत आपली छाप सोडत आहे.

आता पुढील पाच वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोदींनी ऐतिहासिक तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. यातच आता, इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवा यांनी देखील नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. भारताला जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याची ताकद पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक लाडवा म्हणाले की, "पंतप्रधान मोदींची फेरनिवड भारताच्या समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. मोदींची ही तिसरी टर्म केवळ निवडणुकीतील सातत्य नाही तर विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताची वचनबद्धता दर्शवते."

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील विकसित भारतचा संकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून स्थापित करण्यासाठी एक व्यापक रोडमॅपची रुपरेषा आखतो. ज्यामध्ये पायाभूत सुविधा, नाविन्य आणि सर्वसमावेशक वाढ यावर प्रकर्षाने लक्ष केंद्रित करतो, असेही त्यांनी नमूद केले.

‘’पंतप्रधान मोदींचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता मला खात्री आहे की, भारत येत्या पाच वर्षांत अभूतपूर्व आर्थिक सुधारणा, नवकल्पना आणि आपला जागतिक सहभाग वाढवेल. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. देशाच्या विकासाचा मार्ग हा केवळ भारतातील लोकांसाठीच नाही तर जगासाठी एक संधी आहे’’, असेही ते पुढे म्हणाले.

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामुळे सामरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत आणि जगभरातील राष्ट्रांमधील मजबूत जागतिक संबंध वाढवण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे,” अशी अपेक्षा यावेळी लाडवा यांनी व्यक्त केली.

लाडवा पुढे म्हणाले की, ‘’मोदींच्या फेरनिवडीमुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधाना नवा आयाम मिळेल. मला आशा आहे की, ब्रिटनमधील निवडणूकीनंतर दोन्ही देश बहुप्रतिक्षित मुक्त व्यापाराबद्दल ठोस पाऊले उचलतील. मग निवडणूकीनंतर ब्रिटनमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार येवो.’’

“इंडिया ग्लोबल फोरम भारताला जगाशी जोडण्याच्या, विशेषत: तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांत अर्थपूर्ण भागीदारीला चालना देण्याच्या आणि नाविन्यपूर्ण धोरण तयार करण्याच्या आपल्या ध्येयासाठी वचनबद्ध आहे. मी आगामी IGF लंडनची वाट पाहत आहे, जे मोदी सरकार 3.0 चे प्रतिनिधित्व करत असलेल्या अमर्याद संधींचे आणि विशेषत: लंडन स्टॉक एक्सचेंजमधील ग्लोबल इन्व्हेस्टर्स फोरमचे विश्लेषण करेल जे भारतातील विकसनशील गुंतवणुकीच्या लँडस्केपवर अमूल्य अंतर्दृष्टी प्रदान करेल,’’ असेही लाडवा म्हणाले.

IGF लंडन (24-28 जून 2024) अलीकडील भारतीय निवडणुकांचे निकाल, जागतिक भू-राजकारण आणि व्यापारावरील परिणामांचा अभ्यास करेल. यामध्ये 2000 हून अधिक तज्ञ लंडन आणि विंडसरमधील प्रतिष्ठित ठिकाणी 15 कार्यक्रमांसाठी हजेरी लावतील. IGF लंडन 2024 हा जागतिक स्तरावरील पहिला भारत केंद्रित मेळावा असेल.

इंडिया ग्लोबल फोरम बद्दल

इंडिया ग्लोबल फोरम समकालीन भारताची कहाणी सांगतो. बदलाचा आणि विकासाचा वेग भारताने निश्चित केला असून तो जगासाठी एक संधी आहे. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापार आणि जगभरातील राष्ट्रांसाठी IGF हे प्रवेशद्वार आहे. आमचे प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रातील आणि भौगोलिक क्षेत्रातील प्रमुख भागधारकांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT