India GDP Growth Dainik Gomantak
अर्थविश्व

India GDP Growth: सुपरपॉवर इंडिया! जागतिक मंदीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था सुस्साट; IMF ने वाढवला देशाचा ग्रोथ रेट

India GDP Growth Forecast 7 Percent in 2026: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या ‘जागतिक आर्थिक आउटलुक’च्या ताज्या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आकडेवारी समोर आली.

Manish Jadhav

India GDP Growth Forecast 7 Percent 2026: जगभरातील अनेक विकसित देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना भारतीय अर्थव्यवस्था आपल्या देशांतर्गत बाजाराची ताकद, मजबूत बँकिंग प्रणाली आणि विक्रमी उत्पादनाच्या जोरावर सातत्याने प्रगतीची नवीन शिखरे सर करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या ‘जागतिक आर्थिक आउटलुक’च्या ताज्या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आकडेवारी समोर आली.

या अहवालानुसार, 2026 मध्ये भारताचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला, जो मागील अंदाजांपेक्षा अधिक मजबूत आहे. अमेरिका, चीन आणि युरोपियन देशांचा आर्थिक विकास दर 2 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान सीमित असताना, भारत मात्र 7 टक्क्यांच्या सुस्साट वेगाने वाटचाल करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये भारत यंदाच्या आणि आगामी वर्षांत तब्बल 16 टक्क्यांहून अधिक योगदान देणार असून, देश जागतिक विकासाचे प्रमुख इंजिन बनला आहे.

या धडाकेबाज आर्थिक प्रगतीमागे प्रामुख्याने चार प्रमुख घटक कार्यरत आहेत. पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे देशांतर्गत बाजारातील मजबूत मागणी. भारताची 140 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारा मध्यम वर्ग सण-उत्सव, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असून यामुळे बाह्य आव्हानांचा भारतीय बाजारावर फारसा परिणाम होत नाही. दुसरा मोठा आधार म्हणजे केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांवर केला जाणारा विक्रमी खर्च. एक्सप्रेसवे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि नवीन विमानतळांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत.

तिसरा कणा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे बँकिंग क्षेत्रातील एनपीए ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आला असून डिजिटल पेमेंट्स आणि सेवा क्षेत्रानेही झपाट्याने प्रगती केली. चौथा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ‘मेक इन इंडिया’मुळे भारत ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. ॲप्पल आणि फॉक्सकॉनसारख्या दिग्गज कंपन्या देशात प्लॅण्ट उभारणी करत असल्याने निर्यात आणि उत्पादनाला गती मिळाली.

अर्थव्यवस्थेच्या या जबरदस्त वेगाचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. कॉर्पोरेट, आयटी आणि रिटेल क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवीन संधी वाढणार असून, शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने म्युच्युअल फंड आणि एसआयपी धारकांना उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. कंपन्यांचा नफा वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातही सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. आयएमएफचे हे ताजे आकडे हे सिद्ध करतात की, भारत (India) केवळ वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच नाही, तर भविष्यातील जागतिक आर्थिक केंद्र बनण्याच्या दिशेने अतिशय मजबूत पावले टाकत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

SCROLL FOR NEXT