Japan in India Dainik Gomantak
अर्थविश्व

भारत बनले जपानी उद्योजकांनी निवड, 11 कंपन्या करणार 1,338 कोटींची गुंतवणूक

भारतात 2008 मध्ये जपानी कंपन्यांची संख्या 10 होती, ती 2021 मध्ये 170 पर्यंत वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

Japan in India: जपानी कंपन्या दीर्घकाळापासून भारतात आपला तळ ठोकण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमधील नीमरानासह अनेक ठिकाणी जपानी गुंतवणूक क्षेत्रे स्थापन करण्यात आली आहेत. आता आणखी 11 जपानी कंपन्यांनी राजस्थानमध्ये गुंतवणुकीसाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. राजस्थान सरकारने गुरुवारी 11 जपानी कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि यामुळे 1,338 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी जपानी कंपन्यांना राज्यात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि कौशल्य विकास केंद्र बांधण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले. जपानी कंपन्यांनी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि जपानी गुंतवणूक ही राजस्थानमधील उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गेहलोत म्हणाले. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नीमराना येथील डायकिन जपानीज इंस्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स (DJIME) येथे आयोजित कार्यक्रमात गेहलोत बोलत होते. जपानी कंपन्यांनी आता पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, इन्व्हेस्ट राजस्थान आणि बारमेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीत गुंतवणूक करून आणखी एक अध्याय लिहावा, असे गेहलोत म्हणाले.

पुढे बोलतांना, 'जपानी झोन ​​हा उद्योजकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. 11 जपानी कंपन्यांनी केलेल्या या सामंजस्य करारांमुळे 1,338 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि जपान आणि राजस्थानमधील संबंध अधिक उंचीवर जातील,' असे म्हणत पाचपदरा येथे बांधल्या जाणाऱ्या रिफायनरीच्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्येही त्यांनी जपानी कंपन्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार देण्यासाठी जपानी कंपन्यांनी ही कौशल्य विकास केंद्रे उघडावीत, असे ते म्हणाले. यामध्ये आवश्यक ते सहकार्य राज्य सरकार देईल. एका निवेदनानुसार, भारतातील जपानचे राजदूत सुझुकी सातोशी म्हणाले की, भारत आणि जपानमध्ये कायद्याचे राज्य आणि लोकशाही यासारखी मूलभूत मूल्ये आहेत. राज्यात सन 2008 मध्ये जपानी कंपन्यांची संख्या 10 होती, ती 2021 मध्ये 170 पर्यंत वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT