ही दोस्ती तुटायची नाय! भारतात मोदीनॉमिक्स अन् जपानमध्ये आबेनॉमिक्स!

मोदी-आबेंच्या मैत्रीची जगात चर्चा; एकीकडे शिंजो आबे हॉस्पिटलमध्ये मृत्यूला झुंज देत असताना दुसरीकडे पीएम मोदी आपल्या मित्राच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.
Shinzo Abe Narendra Modi Friendship
Shinzo Abe Narendra Modi FriendshipDainik Gomantak

आज जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे ( Japan Ex PM Shinzo Abe ) यांच्यावर गोळी झाडण्यात आल्या, आणि त्यांचा आज दुपारी मृत्यू झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि शिंजो आबे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना या घटनेमुळे फार दु:ख झाले आहे. एकीकडे शिंजो आबे हॉस्पिटलमध्ये मृत्यूला झुंज देत असताना दुसरीकडे पीएम मोदी आपल्या मित्राच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. आबे यांच्यावरील हल्ल्यानंतर पीएम मोदींनी ट्विट (Tweet) केले आणि लिहिले, “माझे प्रिय मित्र आबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे खूप दुःख झाले. आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांचे कुटुंबीय आणि जपानच्या लोकांसोबत आहेत."

शिंजो आबे यांचे भारताशी खास नाते होते. शिंजो आबे हे 1957 मध्ये भारताला भेट देणारे पहिले जपानी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे नातू आहेत. त्यांच्या मांडीवर बसून आबेंनी भारत आणि भारतीयत्वाचे अनेक किस्से ऐकले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव पडला आहे.

शिंजो आबे यांनी पीएम मोदी आणि गुजरातसोबत खास नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात घट्ट मैत्री होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून ही मैत्री आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांची मैत्री होती. 2014 पूर्वीही जपानने गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांत जपानच्या 15 ते 18 मोठ्या कंपन्यांनी गुजरातमध्ये गुंतवणूक केली आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ज्या देशातून परदेश दौऱ्यांना सुरुवात केली, तो जपान हा पहिला देश होता. शिंजो आबे यांनी जपानमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर 2018 मध्येही जेव्हा पंतप्रधान मोदी जपानला गेले तेव्हा दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक घट्ट झाले. त्यानंतर जपानमधून अनेक गुंतवणूकदार भारतात आले.

पंतप्रधान मोदींनी त्यांना भगवद्गीता दिली भेट

भारतातही जेव्हा दोन्ही नेते भेटले तेव्हा ते मोठ्या जिव्हाळ्याने भेटले. पीएम मोदींच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये दोघांमध्ये झालेल्या भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते. भारत भेटीवर आलेल्या शिंजो यांना पंतप्रधान मोदींनी बनारसला नेले, जिथे दशाश्वमेध घाटावर गंगा आरती पाहून आबे मंत्रमुग्ध झाले होते. शिंजो आबे यांना भारतीय संस्कृती आणि सभ्यतेबद्दल प्रचंड आत्मीयता होती. निघताना पंतप्रधान मोदींनी त्यांना भगवद्गीता भेट दिली होती.

भारतात मोदीनॉमिक्स तर जपानमध्ये आबेनोमिक्स प्रसिद्ध

भारताच्या अर्थव्यवस्थेत पीएम मोदी आणि जपानच्या अर्थव्यवस्थेत शिंजो आबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परकीय गुंतवणुकीबाबत विविध देशांशी असलेले संबंध आणि पंतप्रधान मोदींच्या दूरगामी आर्थिक धोरणांना मोदीनॉमिक्स म्हणून ज्या पद्धतीने ओळखले जाते, तसेच काहीसे शिंजो आबे यांच्याबाबतही आहे. जपानचे पंतप्रधान असताना आबे यांनी आर्थिक सुधारणांसाठी प्रभावी धोरणेही आखली. जपानमध्ये आर्थिक सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. मोदीनॉमिक्सप्रमाणेच जपानमधील शिंझो आबे यांच्या धोरणांना आणि विचारसरणीला आबेनॉमिक्स असे नाव देण्यात आले. पीएम मोदींचे मोदीनॉमिक्स आणि शिंजो अबे यांचे आबेनॉमिक्स यांची दोन्ही देसात खूप चर्चा झाली आहे.

Shinzo Abe Narendra Modi Friendship
Shinzo Abe Death: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

हायस्पीड रेल्वेसह अनेक प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य

पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांच्या पुढाकारानेच भारतात बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार झाले. गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प जपानच्या मदतीनेच शक्य झाला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

याशिवाय दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारख्या इतर अनेक प्रकल्पांमध्ये जपान मदत करत आहे, या प्रकल्पातही शिंजो आबे यांचा पुढाकार आहे. भारतातील स्वच्छ भारत मिशनसाठीही त्यांनी सहकार्याची ऑफर दिली. सन 2020 मध्ये भारत आणि जपान यांच्यात संरक्षण विषयक पुरवठा आणि सेवांबाबत परस्पर करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com