FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: आयकर भरणाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, आता 31 डिसेंबरपर्यंत ITR भरल्यास दंड लागणार नाही!

Income Tax News: आता 31 जुलैनंतरही अनेकांना ITR भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. आता आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Income Tax Update: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, सरकारकडून ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती आणि या तारखेनंतर 31 डिसेंबरपर्यंत टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल, पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता 31 जुलैनंतरही ITR भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. आता आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

दंड भरावा लागणार नाही

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये पुरामुळे लोक रिटर्न भरु शकले नाहीत आणि वारंवार तारीख वाढवण्याची विनंती करुनही सरकारने तारीख वाढवली नाही. दरम्यान, आता आयकर विभागाने तुम्हाला आयटीआर भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नसल्याचे सांगितले आहे.

विलंब शुल्क भरण्याची गरज नाही

जर तुम्‍ही ITR भरण्‍यापासून वंचित राहिल्‍यास आणि यावेळी दंडासह विलंबित ITR दाखल करण्‍याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या. आयकर कायद्यातील तरतुदींनुसार, अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्येकाने आयटीआर भरण्यासाठी विलंब शुल्क भरणे आवश्यक नाही.

दंड कोणाला भरावा लागत नाही?

जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर त्याला उशीरा ITR भरताना दंड भरावा लागणार नाही. ही सूट आयकर कायद्याच्या कलम 234F मध्ये नमूद करण्यात आली आहे.

5 लाखांपर्यंत सूट मिळेल

आयकराच्या नवीन कर प्रणाली अंतर्गत, तुम्हाला वैयक्तिक मूलभूत सूट 3 लाख रुपये मिळते. त्याचवेळी, जुन्या कर प्रणालीमध्ये, मूळ सूट मर्यादा वयानुसार बदलू शकते. यामध्ये 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना 2.5 लाख रुपये आणि 60 ते 80 वर्षांपर्यंतच्या लोकांना 3 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 5 लाखांपर्यंत सूट मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

SCROLL FOR NEXT