Section 80C Deduction Limit: जर तुम्ही दरवर्षी ITR (ITR Return File) फाइल करत असाल तर तुम्हाला प्राप्तिकराच्या कलम 80C ची माहिती असेल. या कलमांतर्गत, तुम्हाला गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
कलम 80 C ची मर्यादा वाढवण्याची मागणी करदाते आणि तज्ज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. इतकेच नाही तर, प्री-बजेट 2023 च्या शिफारशीमध्ये, ICAI ने सरकारला कलम 80C अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) साठी कपात 1.5 लाख रुपयांवरुन 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना केली होती.
दरम्यान, ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. 80C ची मर्यादा वाढवण्याबाबत सरकारने स्थिती स्पष्ट केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत सूट मर्यादा वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
सध्या, गृहकर्ज आणि जीवन विमा पॉलिसी यांसारख्या विविध कर बचत योजनांमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची वार्षिक गुंतवणूक (Investment) कलम 80C अंतर्गत वजावटीसाठी पात्र आहे.
कलम 80C अंतर्गत वजावटीसाठी कर बचत योजनांमध्ये PPF, EPF, NSC, NPS, SCSS, बँका आणि पोस्ट ऑफिसमधील 5 वर्षांची FD, ELSS म्युच्युअल फंड इ.
त्यामुळे, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 31 जुलै रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
तसेच, बदलते आर्थिक वातावरण आणि व्याजदराची स्थिती पाहता आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत अल्पबचत योजना सुव्यवस्थित करण्याची आणि सुलभीकरण आणि सूट वाढवण्याची गरज सरकारने ओळखली आहे का, या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री उत्तर देत होते. 2023-24 मध्ये विक्रमी 6.77 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.