Income Tax Payers 2023: अदानी किंवा अंबानी नाही, 'ही' व्यक्ती भरते सर्वाधिक टॅक्स; नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Income Tax Update: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. आता तुमच्याकडे फक्त 4 दिवस उरले आहेत.
Mukesh Ambani & Gautam Adani
Mukesh Ambani & Gautam AdaniDainik Gomantak

Highest Income Tax Payers in India 2023: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. आता तुमच्याकडे फक्त 4 दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजून कर भरला नसेल तर लवकर भरा.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतात (India) सर्वात जास्त आयकर कोण भरतो... हा प्रश्न ऐकल्यावर तुमच्या मनात अंबानी-अदानी किंवा टाटा यांचे नाव आले असेल, पण नाही, तुम्ही चुकीचे आहात. ही व्यक्ती भारतात अदानी-अंबानी पेक्षा जास्त कर भरते.

29.5 कोटी रुपये प्राप्तिकर भरला

जर वैयक्तिक आयकराबद्दल बोलायचे झाल्यास, तर इतर अनेक क्षेत्रे कॉर्पोरेट नेत्यांच्या तुलनेत जास्त कर भरतात.

प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यावेळी अक्षय कुमारने सर्वाधिक कर भरला होता.

अभिनेता अक्षय कुमारने 2022 मध्ये 29.5 कोटी रुपयांचा कर भरला होता. त्याने आपली एक वर्षाची कमाई 486 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.

Mukesh Ambani & Gautam Adani
Income Tax Return: .. तर अशी हुशारी महागात पडणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

सर्वाधिक फी चार्च करतो

बॉलिवूडच्या टॉप स्टार्समध्ये गणला जाणारा अक्षय कुमार सर्वाधिक फी चार्ज करतो.

याशिवाय अक्षय कुमारचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. विशेष म्हणजे, त्याची एक स्पोर्ट्स टीम देखील आहे. याशिवाय तो अनेक ब्रँड्सच्या एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो.

'सन्मान पत्र' अवॉर्ड मिळाला

भारतात वैयक्तिक आयकर भरण्याच्या बाबतीत अक्षय कुमार (Akshay Kumar) पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वात मोठा करदाता अक्षय कुमारला यासाठी 'सन्मान पत्र' पुरस्कारही मिळाला आहे.

अक्षय कुमार 2022 पूर्वीही आयकर भरण्यात नंबर-1 होता. 2021 मध्ये म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षासाठी त्याने 25.5 कोटी रुपये आयकर जमा केला होता.

Mukesh Ambani & Gautam Adani
National Income Tax Day 2023: 24 जुलैलाच का साजरा केला जातो इनकम टॅक्स डे, वाचा एका क्लिकवर

धोनीने 38 कोटी रुपये कर जमा केला

याशिवाय, आतापर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार महेंद्रसिंग धोनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 38 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स आयकर जमा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com