Godrej Properties Gurugram Dainik Gomantak
अर्थविश्व

Godrej Gurugram: मुक्काम पोस्ट गुरुग्राम, श्रीमंतांचा नवा पत्ता! 4 कोटींच्या 600 फ्लॅट्सची अवघ्या काही दिवसांत विक्री

Godrej Properties: 9.5 एकरमध्ये पसरलेल्या या निवासी प्रकल्पात कंपनी सुमारे 750 अपार्टमेंट बांधणार आहे. त्यांची प्रति युनिट प्रारंभिक किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.

Ashutosh Masgaunde

In Gurugram, 600 flats worth Rs 4 crore have been sold in just a few days, Real estate company Godrej Properties Limited:

देशात श्रीमंती आणि गरिबी यातील दरी किती वेगाने वाढत आहे, हे मालमत्तेच्या विक्रीतून स्पष्ट होते. एकीकडे देशातील मोठ्या लोकसंख्येला 30 लाख रुपयांचे घरही विकत घेता येत नाही, तर दुसरीकडे देशात एक असा वर्ग आहे जो खेळणी खरेदी केल्याप्रमाणे करोडोंच्या मालमत्ता खरेदी करत आहे.

ताजं प्रकरण गुरुग्राममधलं आहे. येथे 4 कोटी रुपये किमतीचे 600 फ्लॅट्स अवघ्या काही दिवसांत विकले गेले आहेत. रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने ही माहिती दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने हरियाणातील गुरुग्राममध्ये आपल्या नवीन लक्झरी निवासी प्रकल्पातील 600 हून अधिक फ्लॅट विकले आहेत.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, गुरुग्राममधील सेक्टर-49 मधील गोल्फ कोर्स एक्स्टेंशन रोडवर असलेल्या गोदरेज अॅरिस्टोक्रॅट या प्रकल्पात त्यांनी 2,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे फ्लॅट विकले आहेत.

9.5 एकरमध्ये पसरलेल्या या निवासी प्रकल्पात कंपनी सुमारे 750 अपार्टमेंट बांधणार आहे. त्यांची प्रति युनिट प्रारंभिक किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले की, गुरुग्राम हे गोदरेज प्रॉपर्टीजसाठी अतिशय महत्त्वाचे मार्केट आहे. 2024 मध्ये गुरुग्राममध्ये चार नवीन प्रकल्प सुरू करण्याची आम्हाला आशा आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजने सांगितले की, गेल्या तिमाहीत नोएडा येथील गोदरेज ट्रॉपिकल आयल या प्रकल्पातील 2,000 कोटींहून अधिकच्या मागील सर्वोत्तम विक्रीला मागे टाकून मिळवलेल्या विक्रीच्या मूल्याच्या बाबतीत हा प्रकल्प आतापर्यंतचा सर्वात यशस्वी निवासी प्रकल्प आहे.

एप्रिल-सप्टेंबर 2023-24 दरम्यान, गोदरेज प्रॉपर्टीजने त्यांच्या विक्री बुकिंगमध्ये 48 टक्के वाढ होऊन ती 7,288 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 4,929 कोटी रुपये होती.

7,288 कोटी रुपयांच्या एकूण विक्री बुकिंगपैकी दिल्ली-एनसीआर बाजाराने 3,186 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

यापूर्वी डिएलएफ ने केली अशी कामगिरी

अलीकडेच, रिअल इस्टेट कंपनी DLF लिमिटेडने गुरुग्राममध्ये असलेल्या एका निवासी प्रकल्पात तीन दिवसांत 1,137 लक्झरी अपार्टमेंट विकले. प्रत्येक फ्लॅटची किंमत 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती आणि त्यांच्या विक्रीतून कंपनीला 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला.

डीएलएफचा हा प्रकल्प गुरुग्रामच्या सेक्टर ६३ मधील गोल्फ कोर्स एक्स्टेंशनमध्ये आहे. डीएलएफने सांगितले की, हा प्रकल्प लॉन्च झाल्यापासून तीन दिवसांत पूर्णपणे विकला गेला. त्याचवेळी डीएलएफने गोल्फ कोर्स रोडवरील फ्लॅट 100 कोटी रुपयांना विकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT