Xiaomi Electric Car: चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने या आठवड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) तंत्रज्ञानाची घोषणा केली जाणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ लेई जून यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे.
कंपनीच्या पहिल्या कारचे नाव SU7 आहे, SU चा अर्थ स्पीड अल्ट्रा असे आहे. 28 डिसेंबर रोजी होणार्या कार्यक्रमात कंपनीच्या ईव्ही तंत्रज्ञानाचा उलघडा होणार आहे, अशी माहिती सीईओ लेई जून यांनी दिलीय. या कार्यक्रमात कोणतेही उत्पादन लाँच केले जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीच्या नवीन कारचे ट्रायल प्रोडक्शन सुरू झाले असून काही महिन्यांत कार लॉन्च केली जाऊ शकते. Li Jun यांनी कंपनीच्या पहिल्या EV तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi 2024 च्या पहिल्या सहामाहीत पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. ली जूनने आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की ही कार पुढील काही महिन्यांत लॉन्च केली जाऊ शकते.
दरम्यान, 28 डिसेंबर रोजी कंपनी त्यांचे EV तंत्रज्ञान प्रदर्शित करेल. चिनी वेळेनुसार दुपारी 2 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
Xiaomi CEO Lei Jun ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही प्रश्न आणि उत्तरे देखील पोस्ट केली आहेत. त्यांच्या पहिल्या कारचे नाव SU7 असे का? ठेवण्यात आले असे विचारले असता ली जून म्हणाले, SU म्हणजे स्पीड अल्ट्रा असे ते म्हणाले.
SU7 परफॉर्मन्स बीस्ट असेल असा दावा त्यांनी केला. Xiaomi SU7 ही उच्च कार्यक्षमता असलेली टेक इकोसिस्टम सेडान असेल, असेही ते म्हणाले.
Xiaomi SU7 सध्या ट्रायल प्रोडक्शनमध्ये आहे आणि येत्या काही महिन्यांत देशांतर्गत बाजारात म्हणजेच चीनमध्ये लॉन्च केले जाईल, असे ते म्हणाले. या कारच्या किमतीबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु लोकांच्या अपेक्षेपेक्षा त्याची किंमत चांगली असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.