DLF’वर अखेर महापालिकेचा बडगा; ठोठावला तब्बल 'एवढ्या' रकमेचा दंड

महापालिकेची कारवाई: सामाजिक कार्यकर्त्यांची न्यायालयात धाव
DLF Project File Photo
DLF Project File PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Municipality बांधकाम क्षेत्रातील डीएलएफ कंपनीने पाटो येथील मेगा प्रकल्पासाठी आणलेले साहित्य रस्त्यावर टाकल्याने अखेर महापालिकेने त्यावर बडगा उगारला आहे.

कंपनीला नोटीस बजावत दहा दिवसांत साहित्य हटवण्याचा आदेश दिला आहे, शिवाय एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे आयुक्तांनी स्पष्ट बजावले आहे.

पाटो परिसर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आल्यानंतर येथील सुसूत्रीपणा गायब झाल्यासारखे चित्र दिसत होते. संस्कृती भवनसमोर डीएलएफ कंपनी मेगा प्रकल्प उभारत आहे. या कंपनीने काम सुरू केल्यानंतर स्थलांतर करता येतील, अशी काही कार्यालये उभारली होती.

DLF Project File Photo
Vasco School Accident: धक्कादायक! त्या मुलांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून..

ती कार्यालये रस्त्याच्या बाजूलाच ठेवल्याने त्यास सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला होता. त्यावेळी एका नगरसेवकाने या कंपनीकडून पाच लाख रुपये घेतल्याची माहिती संबंधित सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली होती.

त्यावेळी दैनिक ‘गोमन्तक’ने याविषयी आवाज उठविला होता. त्यावेळी महापालिकेच्या बैठकीत या प्रकारावर नगरसेवक विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर यांनी आवाज उठवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

DLF Project File Photo
Rajya Sabha: ठरलं! राज्यसभेसाठी सदानंद शेट तानावडे निश्चित

मात्र, त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले होते. इकडे कंपनीची दोन-तीन वरून सात-आठ कार्यालये झाली आणि इमारतीचे साहित्य टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्यास कंपनीने सुरुवात केली.

पुन्हा एकदा ‘गोमन्तक’ने ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा नगरसेवक चोडणकर यांनी बैठकीत पाटो येथील कार्यालये का हटविली नाहीत? असा सवाल केला. त्यावेळी महापौरांनी आठ दिवसांत ही कार्यालये हटवतो, असे सांगितले;

पण तेही आश्‍वासन हवेत विरले. अखेर याविषयी पुन्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ तयार करून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com