Audi India|Luxary Cars Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतात Luxary Cars टॉप गिअरमध्ये! 2023 मध्ये दररोज विकल्या गेल्या 50 लाखांवरील 128 चारचाकी

Luxary Cars In India: "पारंपारिक व्यावसायिक करणाऱ्यांव्यतिरिक्त, त्यांना गेल्या वर्षी पगारदार व्यावसायिक, डॉक्टर, वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून होणाऱ्या मागणीत मोठी वाढ झाली आहे."

Ashutosh Masgaunde

In 2023, 128 four-wheelers luxary cars over 50 lakhs were sold every day in India:

भारतातील लक्सरी कार्सच्या विक्रीने 2023 मध्ये नवा उच्चांक गाठला आहे. 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमती असलेल्या कार्सची कोविड पूर्वी म्हणजेच 2019 मध्ये दरदिवशी 95 युनिट्सची विक्री व्हायची. मात्र, 2023 मध्ये लक्सरी कार्स निर्मात्या कंपन्यांनी दमदार कामगिरी करत ही संख्या दरदिवशी सरासरी 128 पर्यंत पोहचवली आहे.

भारतातील लक्सरी कार्सची विक्री वाढण्याचे श्रेय कार निर्मात्या कंपन्यांनी कोविड-19 नंतर जीवनशैलीतील बदल, तरुण व्यावसायिकांची उच्च श्रेणीतील कार्सची निवड, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि वाढती उत्पन्नाची पातळी याला दिले आहे.

2023 मध्ये लक्झरी कार्सची विक्रमी विक्री

कार निर्माती करणाऱ्या कंपन्यांच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये देशात विक्रमी 46,000-47,000 लक्झरी वाहने विकली गेली, जी मागील वर्षी नोंदवलेल्या 38,000 युनिट्सपेक्षा 21% आणि 2019 च्या तुलनेत 35% जास्त आहेत.

मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू या दोन प्रमुख कंपन्यांनी 2023 मधील त्यांची भारतातील विक्री अद्याप जाहीर केलेली नाही.

ऑडीने नुकतेच सांगितले की, त्यांनी 2023 मध्ये त्यांची विक्री 89% ने वाढवून 7,931 युनिट्सवर पोहचवली आहे. जी मागील कॅलेंडर वर्षामध्ये 4,187 होती.

तरुण ग्राहकांचा लक्झरी कार्सकडे कल

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनी सांगितले की, पारंपारिक व्यावसायिक करणाऱ्यांव्यतिरिक्त, त्यांना गेल्या वर्षी पगारदार व्यावसायिक, डॉक्टर, वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून होणाऱ्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

"आमच्या एकून कार विक्रीपैकी 42% विक्री 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना झाली आहे. भारतात, महागड्या कार खरेदी (INR 50 लाख आणि त्याहून अधिक) करण्याचे आर्थिक स्वातंत्र्य पूर्वी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खरेदीदारांकडे होते," असे ढिल्लन पुढे म्हणाले.

भारतात एसेम्बल झालेल्या कार्सचीही चलती

स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वोने नुकतेच सांगितले की, XC60 मॉडेलमुळे कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारतात त्यांची एकूण कार विक्री 31 टक्क्यांनी वाढून 2,423 युनिट्स झाली आहे.

व्होल्वो कार इंडियाने 2022 कॅलेंडर वर्षात देशांतर्गत बाजारात 1,851 कार विकल्या हो, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये, कंपनीने XC40 नंतर त्याचे दुसरे इलेक्ट्रिक वाहन, C40 सादर केले. भारतातच एसेंम्बल केलेल्या इलेक्ट्रिक XC40 कारने या कालावधीत 510 युनिट्सची विक्री केली आहे. दरम्यान, C40 कारलाही देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि 2023 मध्ये अल्प कालावधीत 180 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा ​​म्हणाल्या, "२०२३ हे वर्ष वाढीच्या दृष्टीने प्रभावी ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३१ टक्के वाढ ही ग्राहकांचा आत्मविश्वास दर्शवते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Goa News Live Update: कृषी मंत्री रवी नाईक यांनी कुत्र्याच्या चाव्याने पीडित महिलेची घेतली भेट

Quepem lottery: केपेची लॉटरी ठरली 'हिट'! गणेशोत्सव मंडळाच्या कूपनसाठी मध्यरात्रीपासून गर्दी; 2 कि.मीची रांग

Canacona: चार रस्ता-आगोंद रस्ता देतोय अपघातांना आमंत्रण; वाहनचालक त्रस्त, ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT